• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोगानेच A टू Z सांगितलं!

May 22, 2026 by admin Leave a Comment


राज्य निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन (SIR) मोहिमेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे आता घरबसल्या सहज तपासता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संपूर्ण देशातील राज्यांची यादी उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी वेबसाईटवर जाऊन आपले राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडून नाव शोधता येणार आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मतदारांनी पूर्वी कोणत्या मतदारसंघात मतदान केले होते हे आठवत असल्यास नाव शोधणे अधिक सोपे होईल. मतदारसंघाचे नाव टाकूनही मतदार यादीतील माहिती मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी आपली माहिती अचूकपणे अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत मतदार गणना फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. बीएलओ अधिकारी घरी आल्यानंतर नागरिकांनी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे तयार ठेवावीत. तसेच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून बुथ, सीरिअल नंबर आणि मतदारसंघाची माहिती शोधून ठेवल्यास प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाची बाब म्हणजे, 2004-05 मध्ये किंवा वर्षांपूर्वी तुम्ही कोणत्याही शहरात राज्यात असले तरी आम्ही तयार केलेल्या मॅपींगद्वारे तुमची माहिती सहज मिळेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in