• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्याच्या राजकारणात खळबळ, शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; मुंबईहून येताच गुलाबराव पाटील…

May 25, 2026 by admin Leave a Comment


Jalgaon Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील उपस्थित होते. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्जा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु जळगावची जागा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या जागेवरून ते आपल्या मुलाला संधी द्यावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे भाजपानेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळेच आता भाजपा आणि शिंदे गटाची रस्सीखेच सुरू असताना आता जळगावात झालेली ही गुप्त बैठक चर्चेचा विषय ठरली आहे.

गुलाबराव पाटील आणि इतर आमदारांची तातडीची बैठक

याआधी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत काल जामनेरमध्ये भाजप आमदार तसेच खासदारांच्या सोबत भाजपाची एक बैठक झाली होती. या बैठकीनंतर आता आज मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची बैठक पार पडली आहे. मुंबईहून जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील थेट आमदारांसोबतच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले आहेत. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेने दावा केला असून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली जात आहे. विधान परिषदेतील निवडणुकीतील रणनीती संदर्भात तसेच उमेदवारी व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेची ही तातडीची बैठक असल्याचे बोलले जात आहे.

भाजपानेही लावली आहे ताकद

दुसरीकडे भाजपाने गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा भाजपाच्याच ताब्यात आहे. त्यामुळे यावेळीही आम्हालाच ही जागा मिळावी, असा भाजपाचा आग्रह आहे. ही जागा भाजपाला मिळावी यासाठी मंत्री गिरीश महाजन सक्रीय झाले आहेत. त्यामुळे आता एका प्रकारे गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. आता भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in