
हिंगोली येथील कयादु नदीला पूर अल्याने बोलडा फाटा ते उमरा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात मध्येरात्रीपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कयादू नदी वाहत दुथडी भरून आहे.
धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील शेते जलमय झाली आहेत. धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिके पाण्याखाली गेली असून शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील 48 तास पडलेल्या दमदार पावसानंतर नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर आला. यंदाच्या पावसाळ्यातील आसना नदीला पहिलाच पूर आला आहे. नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्वदूर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज नांदेड जिल्ह्याला पुन्हा पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
अकोला शहरातील मोर्णा नदीच्या पातळीत वाढ. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पुरस्थिती. अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या मोर्णा देखील पूर आलाय.. या नदीवर असलेला 'राजेश्वर सेतू पूल' वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.
जळगाव जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले 78 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. मनुदेवी धबधबा प्रवाहित झाला. मुक्ताईनगर भुसावळ रावेर यावल परिसरात नदी नाल्यांना पूर आला आहे.
परभणी येथील पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. सकाळी झालेल्या पावसामुळे थूना नदीला पूर आला असून 5 गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिक पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास करतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद करण्यात आलाय.





Leave a Reply