• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद’नंतर या रहस्यमयी चित्रपटाची तगडी कमाई; 6 दिवसांत 61% बजेट वसूल

June 26, 2026 by admin Leave a Comment


आशयघन आणि उत्तम अभिनय असलेल्या मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये शोज मिळतात आणि प्रेक्षकसुद्धा तिकिटबारीवर गर्दी करतात, हे गेल्या काही महिन्यांत सिद्ध झालं आहे. ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता ‘घबाडकुंड’ थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणतंय. गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण या चित्रपटांच्या कमाईचे आकडेच त्याचा पुरावा देत आहेत. ‘घबाडकुंड’ या एडव्हेंचर-सस्पेन्स थ्रिलरने ‘सुपर डुपर’लाही मागे टाकलं आहे. 2026 या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणारा सहावा मराठी चित्रपट ठरला आहे.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘घबाडकुंड’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 35 लाख रुपयांची कमाई केली आहे. जरी मंगळवारी झालेल्या 43 लाख रुपयांच्या तुलनेत बुधवारी 18.6 टक्क्यांची घट पहायला मिळाली असली तरी आता ‘तुंबाडची मंजुळा’ आणि ‘देऊळ बंद 2’ यांच्या कमी कमाईचा हा चित्रपट फायदा उचलताना दिसत आहे. भारतात या चित्रपटाची एकूण कमाई 3.70 कोटी रुपयांपर्यंत झाली आहे. प्रितम एसके पाटील दिग्दर्शित हा चित्रपट सहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. गेल्या सहा दिवसांत या चित्रपटाने बजेटच्या 61.66% भाग वसूल केला आहे.

‘घबाडकुंड’ या चित्रपटाने नम्रता संभेरावच्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3.44 कोटी रुपयांचा लाइफटाइम गल्ला जमवला होता. यासह आता हा चित्रपट 2026 मधील सहावा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. लवकरच हा चित्रपट प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत यांच्या ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ या चित्रपटालाही मागे टाकेल, असं चित्र दिसतंय. या चित्रपटाने 8.97 कोटी रुपयांची कमाई केली होती.

2026 मधील सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट

  • राजा शिवाजी- 105.68 कोटी रुपये
  • देऊळ बंद 2- 72.24 कोटी रुपये
  • क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम- 28 कोटी रुपये
  • तुंबाडची मंजुळा- 13.83 कोटी रुपये
  • अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई- 8.97 कोटी रुपये
  • घबाडकुंड- 3.70 कोटी रुपये
  • सुपर डुपर- 3.44 कोटी रुपये

‘घबाडकुंड’मधून कल्पनेच्या पलीकडचं एक वेगळंच ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या प्रकल्पाला लाभली आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ प्रस्तुत मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स असलेला ‘घबाडकुंड’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट 19 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG Cylinder Supply: 30 जूननंतर नाही मिळणार गॅस सिलेंडर? सरकारची गाईडलाईन काय?
  • ‘कुठे आहेत तुझे बाबा’ असं डिवचताच मुख्यमंत्री विजय यांना पहिल्यांदाच सणसणीत उत्तर
  • Vaibhav Sooryavanshi: फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यावी…आयर्लंडविरुद्ध धुमाकुळ घालण्यासाठी वैभवला द्रविडकडून मिळाला लाखमोलाचा सल्ला
  • प्रवाशांनी भरलेलं दोन विमान अचानक आमनेसामने; अहमदाबाद विमानतळावरच घडली थरारक घटना
  • Vaibhav Sooryavanshi : चांगल्या खेळाडूंची किंमत मोजून आम्ही..; वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत कोच स्पष्टच बोलले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in