• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राजस्थान रॉयल्स सोडणं जोखिमचं होतं..! या पर्वात चेन्नईकडून खेळणारा संजू सॅमसन असं का म्हणाला?

July 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेपासून संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. यापूर्वी संजू सॅमसनने 11 वर्षे राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्यामुळे फ्रेंचायझी सोडताना नेमकं काय घडलं? याबाबतचा खुलासा संजू सॅमसनने केला आहे. क्रिकेट कारकिर्दीतील हा निर्णय म्हणजे जोखिम असल्याचं स्पष्टीकरण संजू सॅमसन याने दिलं आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत सुमार कामगिरीनंतर महेंद्रसिंह धोनीचा एक सल्ला कामी आला. त्याच्या त्या शब्दांमुळे आत्मविश्वास परतला आणि स्पर्धेत चांगली कामगिरी केली. संजू सॅमसनने आयपीएल 2026 स्पर्धेच्या 14 डावात 4336 च्या सरासरीने आणि 165.63 च्या स्ट्राईक रेटने 477 धावा केल्या. या दरम्याने त्याने दोन शतकं ठोकली आणि एक अर्धशतकही साजलं केलं. त्याचा या कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्ससाठी डील फायद्याची ठरली असंच म्हणावं लागेल. आता यावर संजू सॅमसनने आपलं म्हणणं मांडलं.

काय म्हणाला संजू सॅमसन

चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या संजू सॅमसनने जिओस्टारवर सांगितलं की, ‘राजस्थान रॉयल्स सोडणे ही एक जोखिम होती. एकदा तुम्ही फ्रँचायझीला तुमच्या भावना सांगितल्या की, मागे फिरता येत नाही. तुम्ही अशा संघात जाऊ शकता जिथे तुम्हाला जायचे नाही किंवा लिलावातही कोणतीही खात्री नसते.’  संजू सॅमसनने पुढे सांगितलं की, ‘या निर्णयामागे दोन कारणे होती. पहिले म्हणजे, मला खात्री होती की 2025 हा राजस्थान रॉयल्ससोबतचा माझा शेवटचा हंगाम असेल. मी माझ्या कुटुंबाशी आणि पत्नीशी यावर सविस्तर चर्चा केली होती.’

संजू सॅमसन पुढे म्हणाला की, ‘मी एक आत्मविश्वासू व्यक्ती आहे. माझा विश्वास आहे की मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. मी नेहमी शून्यातून सुरुवात करायला तयार असतो. बऱ्याच लोकांनी मला सांगितले होते की माझी फलंदाजीची शैली चेपॉकच्या संथ खेळपट्टीला अनुकूल नसेल.’ पहिल्या तीन सामन्यांमध्ये संजूला संघर्ष करावा लागला. पण संघाच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास मिळाला.  दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मोठ्या करारापैकी एक करार होता. संजू सॅमसन 18 कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाला, तर त्या बदल्यात राजस्थान रॉयल्सला रवींद्र जडेजा आणि सॅम करन मिळाले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in