• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राजकीय घडामोडींना वेग, पक्षप्रमुखांनीच मोठा डाव टाकला; थेट पोटनिवडणुकीच्या रिंगणात

July 6, 2026 by admin Leave a Comment


बिहारच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी जनसुराज पक्षाने प्रशांत किशोर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बांकीपूरमध्ये 30 जुलै रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. प्रशांत किशोर यांना उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

जनसुराजचे प्रदेश अध्यक्ष मनोज भारती यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक विशेष असणार आहे. जनसुराज पक्ष या पोटनिवडणुकीत तगडा उमेदवार देईल. उमेदवारीविषयी निर्णय घेण्यात येईल. बांकीपूरमधील जनतेशी आम्ही संवाद साधला आहे. तेथील जनता भाजपच्या विरोधात आहे’.

मागच्या निवडणुकीत घेतली होती माघार 

बिहारच्या बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी या जागेवरील आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर  ते राज्यसभेवर गेले. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याचे निश्चित होते. विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर (Prashant Kishor)  यांनी बिहारमध्ये दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार होते. परंतु ऐनवेळी त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय जाहीर केला. पुढे त्यांनी केवळ निवडणुकीच्या प्रचारावर लक्ष केंद्रीत केलं.

पहिल्यांना प्रशांत किशोर निवडणूक लढणार

प्रशांत किशोर हे आयुष्यातील पहिली विधानसभा निवडणूक लढणार आहेत. त्यांनी बिहारच्या राजकारणात जनसुराज पक्षाची ओळख निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. आता बांकीपूरच्या जनतेला नवा नेता निवडायचा आहे. ते कोणाला साथ देणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

बाकींपूरमध्ये भाजपचं वर्चस्व

बांकीपूरमध्ये भाजपचा दबदबा राहिला आहे. या मतदारसंघातून 5 वेळा भाजपचा उमेदवार जिंकून आला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघातील पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. भाजप ही जागा राखण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी बाजी मारल्यास त्यांचा विजय ऐतिहासिक ठरेल. त्यांच्या विजयाने जनसुराज पक्षाचे बिहारच्या विधानसभेत खाते उघडेल. जनसुराज पक्षाचा विधानसभेत एकही आमदार नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कैद्यांसाठी लिहिलं गाणं, पण बनलं शाळेतील प्रार्थना गीत, इतकं सुंदर की पुन्हा-पुन्हा ऐकू वाटतं
  • Petrol Diesel Price : तेलाच्या किमती धाड.. धाड कोसळल्या, अखेर गुड न्यूज आलीच, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत..
  • अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट, काय आहे नेमका प्लान?
  • IND vs ENG: भारतीय संघाच्या सततच्या पराभवावर सूर्यकुमार यादवचे विधान चर्चेत; इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यापूर्वी Video Viral
  • LPG News : गरजेला अमेरिका उभी राहिली, म्हणून भारताने आता LPG आयाती बाबत घेतला एक महत्वाचा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in