• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रस्ते कसले? ही तर नांगरलेली जमीन… शिवसेनेच्या खासदाराचा नाशिकच्या खड्ड्यावरून सरकारला खरमरीत टोला

August 12, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमधील खड्ड्याने शहराची रया गेली. पाच जणांचा बळी गेला तर काही जण जखमी झाले. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवरून पालिका प्रशासन आणि सरकार ट्रोल झाले. आता पाच हजारांहून अधिक खड्डे बुजावल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तर उद्धव सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खड्ड्यांवरून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी नाशिक एमआयडीसीमधून अनेक कंपन्या बंद झाल्यावरून सरकारवर खरमरीत टीका केली. अनेक जण बेरोजगार आहेत. स्वप्न घेऊन काम शोधतात पण नोकरी मिळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्यात 5 वर्षांत 36 हजार 211 कंपन्या बंद

गेल्या पाच वर्षात ३६ हजार कंपन्या बंद पडल्या. नाशिक आणि मुंबईत कंपन्या बंद पडल्या आहेत. मॅन्युफॅक्टरींग कंपन्या साडे सहा हजार बंद पडल्या.सर्विस सेक्टर च्या १४ हजार कंपन्या बंद पडल्या आहेत. मुंबईत 12 हजार कंपन्या तर पुण्यात 6,433 कंपन्या बंद पडल्याची माहिती खासदार वाजे यांनी दिली. कंपन्या बंद होण्यासाठी विविध कारणे असल्याचे ते म्हणाले.
काही कंपन्या स्थानिक अडचणी मुळे बंद पडल्या.

किती कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम झाला हा प्रश्न विचारला पण उत्तर मिळाले नाही. कोणाकडूनही आकडेवारी पुढे आली नाही. बेरोजगार स्वप्न घेऊन काम शोधतात पण नोकरी मिळत नाही. नवीन कामगारांना घेण्याकडे ओढ कंपन्यांची आहे. कारण कमी खर्चात काम होतं.नाशिक मध्ये कामगारांना कामावरून काढले त्यानं आत्महत्या केली. काही कर्ज घेतले असतात ते कसे फेडणार हा सवाल आहे. रोजगार बंद होतात तेंव्हा उपलब्ध होणारे प्रश्न याचा विचार करावा. मुख्यमंत्री म्हणून ते गुंतवणूक साठी प्रयत्न करतात हे चुकीचं नाही. कंपनी बंद पडल्या वर प्लॅाट तसाच पडून राहतो. कर्ज असतात त्यामुळे जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे नव्या कंपन्या येण्यासाठी वेळ लागतो, असे खासदार वाजे म्हणाले.

नाशिकचे रस्ते नांगरलेल्या जमीनी सारखे

नाशिकचे रस्ते नांगरलेल्या जमीनी सारखे झाले आहेत असं मी म्हणालो होतो तेंव्हा माझ्यावर टिका झाली होती, आता खड्डे दिसू लागले आहेत, अशी टीका वाजे यांनी केली आहे. यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत. याविषयी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. १७ तारखेला आमच्या पक्षाचा (उद्धव ठाकरे शिवसेना) मोर्चा आहे, नाशिककर त्यात सहभागी होतील. संजय राऊत मार्चला येणार आहेत, अशी माहिती खासदार वाजे यांनी दिली.

कुंभमेळा कामांचा बनावट वर्क ऑर्डर, चार जण ताब्यात

कुंभमेळा कामांचा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई केली. 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आगामी कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर ३० ते ३२ हजार कोटींच्या होणाऱ्या कामांचा गैरफायदा घेऊन मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीने ४०० ते ५०० कोटींचे बनावट टेंडर काढण्यात आले. ९ ठेकेदारांना काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत ६५ लाख रुपये उकळण्यात आले. मूळ वर्क ऑर्डरची कॉपी-पेस्ट करून बनावट वर्क ऑर्डरही देण्यात आली. वर्क ऑर्डर घेऊन ठेकेदार सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे गेल्यानंतर फसवणूक उघड झाली. फसवणुकीतील एक ठेकेदार छत्रपती संभाजीनगरचा आहे. नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत जामनेरमून तिघांना तर धुळ्याजवळून एकाला ताब्यात घेतले आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारीच ४०० ते ५०० कोटींच्या टेंडर घोळाचा उल्लेख केला होता या प्रकरणी या पूर्वीच विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in