• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा….

July 31, 2026 by admin Leave a Comment


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रविवारी घरातून बाहेर पडताना मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यामुळे प्रभावित होणाऱ्या फेऱ्या  खालीलप्रमाणे असतील:

मेन लाईन:

ब्लॉकचा कालावधी:

माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या ‘डाऊन’ जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथून ‘डाऊन’ धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे येथून पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथून पुन्हा ‘डाऊन’ जलद मार्गावर वळवल्या जातील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या ‘अप’ जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर ‘अप’ धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील, माटुंगा येथून पुन्हा ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर लाईनवरील ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे ‘डाऊन’ हार्बर लाईन: सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ‘अप’ हार्बर लाईन: सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या ‘डाऊन’ हार्बर लाईनवरील गाड्या आणि सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या ‘डाऊन’ हार्बर लाईनवरील गाड्या रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या ‘अप’ हार्बर लाईनवरील सेवा बंद राहतील.

ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉकच्या कालावधीत हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम लाईन वरून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in