• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रणवीरच्या ‘सीक्रेट डील’वर फरहानने फेरलं पाणी? रागाच्या भरात केली तक्रार; ‘डॉन 3’ वादात नवा खुलासा

May 28, 2026 by admin Leave a Comment


‘डॉन 3’ या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. यामागचं कारण म्हणजे शूटिंगच्या काही दिवस आधीच अभिनेता रणवीर सिंहने या प्रोजेक्टमधून घेतलेली माघार. यामुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांना मोठा फटका बसला आहे. फरहानने याप्रकरणी रणवीरविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) तक्रार केली. फेडरेशनच्या बैठकीनंतर रणवीरविरोधात इंडस्ट्रीत असहकाराचे आदेश जारी करण्यात आले. या संपूर्ण घडामोडींदरम्यान आता अशी माहिती समोर येत आहे की ‘डॉन 3’ हा चित्रपट सोडण्याच्या बदल्यात रणवीरने फरहानला एका ‘सीक्रेट डील’ची ऑफर दिली होती. मात्र फरहानला ही गोष्ट न पटल्याने त्याने थेट तक्रार केली.

रणवीर सिंहची ‘सीक्रेट डील’ काय होती?

2023 मध्ये निर्मात्यांकडून ‘डॉन 3’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. यामध्ये रणवीर सिंह डॉनची मुख्य भूमिका साकारणार होता. नंतर काही मतभेदांमुळे रणवीरने या चित्रपटातून शूटिंगच्या काही दिवस आधी अचानक माघार घेतली. यामुळे निर्मात्यांचं 45 कोटी रुपयांचं नुकसान झालं.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर सिंहच्या टीमने फरहान अख्तर आणि इतरांसोबत मिळून हे प्रकरण सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. रणवीरकडून एक्स एंटरटेन्मेंटला 35 कोटी रुपयांची एक मोठी ऑफर देण्यात आली होती. यामध्ये अशी डील होती की रणवीर हा फरहान आणि इतरांना 10 कोटी रुपये परत करणार. त्याचसोबत एक्सेल एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली भविष्यात त्याच्यासोबत बनणाऱ्या कोणत्याही चित्रपटावर 25 कोटी रुपयांची सूटसुद्धा देण्यात येईल.

रणवीरची ऑफर नाकारली

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी रणवीर सिंहची ही ऑफर नाकारली. याप्रकरणी अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र रणवीरने चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने फरहान आणि रितेश यांच्या निर्मिती संस्थेला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे.

एक्सेल एंटरटेन्मेंटचा मालक फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी फेडरेशनकडे केलेल्या तक्रारीत हे स्पष्ट केलंय की ते भविष्यात कधीच रणवीर सिंहसोबत काम करणार नाहीत. गेल्या दोन वर्षांत जे काही घडलं, त्यानंतर फरहान आणि रितेश यांना रणवीरसोबत काम करायचंच नाही, हे अगदी स्पष्ट असल्याचं म्हटलं गेलंय. शूटिंगमधील विलंब, वाद आणि अनिश्चिततेमुळे त्यांचं मोठं आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांनी रणवीरची ही ऑफर नाकारली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही…
  • Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
  • अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा
  • IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार
  • महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in