• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत धमाकेदार वळण; प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीची एण्ट्री

June 12, 2026 by admin Leave a Comment


स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे यांची एण्ट्री होणार आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी विक्रांतिका रणशिंगे ही अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत.

यशस्वी उद्योजिका, समाजसेविका आणि आदर्श नेता म्हणून ओळखली जाणारी विक्रांतिका प्रत्यक्षात सत्तेचे खेळ पडद्यामागून खेळणारी एक कुशल रणनीतीकार आहे. तिच्या एका फोनवर निर्णय बदलतात आणि अनेकांचं भविष्य नव्याने लिहिलं जाते. राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, बिल्डर्स आणि उद्योगपती तिच्याशी संबंध जपण्यातच आपलं हित मानतात.

विक्रांतिकाला माणसांची पारख आहे. समोरच्याला विश्वास देऊन जिंकायचं, गरज पडली तर भीती दाखवायची आणि विश्वासघात झाला तर कोणतीही दया न दाखवता त्याची किंमत वसूल करायची हा तिचा स्वभाव. या भूमिकेविषयी सांगताना मेघा घाडगे म्हणाल्या, ‘विक्रांतिका रणशिंगे ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे.”

जवळपास 20 वर्षांनंतर मी मालिका विश्वात पुनरागमन करतेय. माझ्या स्वभावाशी मिळतं जुळतं हे पात्र आहे. सडेतोड उत्तर देणारी आणि अत्यंत करारी अशी ही भूमिका आहे. ऐकताक्षणीच मी या भूमिकेसाठी होकार दिला. विक्रांतिका प्रत्येक परिस्थितीचा विचार करून चाल खेळते. त्यामुळे प्रेक्षकांना तिचा पुढचा डाव काय असेल याची कायम उत्सुकता राहील,” असं त्या म्हणाल्या.

विक्रांतिकाच्या येण्याने राया-मंजिरीच्या आयुष्यात नवं वादळ येणार आहे. 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेचे यापुढील भाग रात्री 11.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळतील. यामध्ये विशाल निकम आणि पूजा बिरारी बांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: 19 चौकार अन् 6 षटकार, वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा मैदानात धुमाकुळ
  • Ketan Agarwal Case : पोलिसांसमोर सिया गोयलने उघडले सर्व राज, का केली केतनची हत्या? कारण ऐकून पोलिसही थक्क…
  • Maharashtra News LIVE : वेनेजुएलात शक्तीशाली भूकंप, 10 हजारपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची भिती
  • मुंबई लोकल तरुण हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट; मयंकच्या कुटुंबियांचा आक्रोश, सरकारकडे केली कारवाईची मोठी मागणी
  • Earthquake : जगात हाहाकार… पहाटे पहाटे आक्रोश आणि किंकाळ्या…10 हजार लोकांचा मृत्यू? व्हेनेझुएलात भूकंपाने दहशत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in