• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या प्राण्याच्या रक्तापासून बनवला जातो सापाच्या विषाचा उतारा, तुम्हाला माहितीये का?

July 4, 2026 by admin Leave a Comment


सापाचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीतीने काटा उभा राहातो. सापांबद्दल समजात अजूनही बरेच गैरसमज आहेत, याच गैरसमजामधून साप मारले जातात. त्यामुळेच आज सापांच्या अनेकद दुर्मिळ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला न मारता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, ते त्याला रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी सोडतील. साप चावल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम काय करतात, तर रुग्णालयात जाऊन सापाच्या विषाचा प्रभाव कमी करणारा अ‍ँटीडोट घेतात. त्यालाच सोप्या भाषेत सापाच्या विषावरील उतारा देखील म्हटलं जातं. जर तुम्हाला अ‍ँटीडोट वेळेत मिळाला तर तुमचा जीव वाचू शकतो.  मात्र जर उशिरा झाला तर मात्र तुमच्या जीवाला धोका निर्माण होतो.

हा अ‍ँटीडोट कसा निर्माण करतात हे तुम्हाला माहिती आहे का?  या अ‍ँटीडोटमध्ये कोणत्या प्राण्याचं रक्त असतं याचा कधी तुम्ही विचार केलाय. सापाच्या विषाचा उतारा किंवा अ‍ँटीडोट बनवण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आणि गुंतागुतीची असते, आणि त्यासाठी घोड्याच्या रक्ताचा वापर केला जातो. सर्व प्रथम अ‍ँटीडोट बनवण्यासाठी शास्त्रज्ञ नाग, मण्यार, घोणस, फुरसे अशा विषारी सापाची निवड करतात, त्यांना पकडून एका काचेच्या भांड्यामध्ये त्याचं विष गोळा केलं जातं, त्यानंतर त्या विषावर आवश्यक ती प्रक्रिया करून, त्याची पावडर तयार केली जाते.

प्रयोगशाळेमध्ये सापाच्या विषावर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ते विषाचं इंजेक्शन घोड्याच्या शरीरात इंजेक्ट केलं जातं. मात्र सुरुवातीला या विषाचं प्रमाण अती अल्प असतं, त्यामुळे त्याचा घोड्यावर काहीही परिणाम होत नाही, सापाच्या विषाचा धोका ओळखून घोड्याच्या शरीरात अँडबॉडीज तयार होतात, त्यानंतर या विषाचं प्रमाण हळुहळु वाढवलं जातं. जेव्हा शास्त्रज्ञांना खात्री पटते की आता घोड्याच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात अँटी बॉडीज तयार झाल्या आहेत, तेव्हा त्याच्या शरीरातून थोडं रक्त काढलं जात आणि त्यातून पुढे त्यावर प्रक्रिया करून सापाच्या विषाचा अँटीडोस बनवला जातो. घोडा हा अधिक सशक्त आणि ताकदवान प्राणी असतो, तसेच तो माणसाशी सहज मैत्री देखील करू शकतो, त्यामुळे यासाठी घोड्याचीच निवड केली जाते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लान
  • काँग्रेसला मोठा धक्का बसणार, माजी मुख्यमंत्र्यांसहित 2 दिग्गज नेते पक्ष सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • या अभिनेत्याचं नाव ऐकताच रजनीकांत आणि नसीरुद्दीन शाह यांनी चित्रपट करण्यास दिलेला नकार, कारण…
  • High Court : हलालाच्या नावाखाली सामूहिक बलात्कार, हायकोर्टाने कठोर शब्दात फटकारलं, ट्रिपल तलाकच्या आडून तुम्हाला..
  • वास्तूशास्त्रात सांगितलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पाच वस्तू कधीच जमिनीवर ठेऊ नका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in