• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या देशात मगरीशी लावले जाते थाटामाटात लग्न, कारण मोठे विलक्षण…

July 9, 2026 by admin Leave a Comment


Mexico Crocodile Wedding Tradition : अनेक संस्कृतीत नेहमीच लग्नं वाजत गाजत होत असतात. वधू आणि वराची वरात बँड बाजाने काढली जात असते. परंतू जगात एक अशी देखील जागा आहे जेथे मगरीशी लग्न केल्याने तरुणांना सुंदर वधू मिळते आणि धनधान्य आणि बरकत येते. तुम्हा ऐकायला हे विचित्र वाटेल. परंतू स्थानिक लोकांची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. या परंपरेला आस्था, संस्कृती आणि निसर्गाचा सन्मान म्हणून पाळले जाते. ही परंपरा आजही या देशात साजरी केली जाते.

मगर पकडणाऱ्यास मुलगी देतात

मेक्सिकोच्या ओआक्साका (Oaxaca) राज्यातील एका छोटेसे खेड सॅन पेड्रो हुएमेलुला येथे जर वर्षी एक अनोखे लग्न लावून दिले जाते. येथील मेयर एका मादी मगरीशी पारंपारिक रिती रिवाजाने लग्न करतात. लग्नाच्या वेळी या मगरीला सफेद वेडिंग गाऊन परिधान केला जातो. तिला नवरी सारखे नटवले जाते. मेयर सर्व रितीरिवाज करतात. लग्नानंतर मगरीला मिठी मारुन तिला चुंबन दिले जाते. सुरक्षेसाठी अर्थात मगरीचे तोंड बांधलेले असते.

मगरीशी लग्न का ?

ही एक २३० वर्षे जुनी आदिवासी परंपरा आहे. स्थानिक लोकांच्या मते मगर नदी आणि समुद्राच्या देवीचे प्रतिक आहे. मेयरने मगरशी विवाह करणे निसर्गाचा सन्मान,संतुलनाचा संदेश मानला जातो. लोकांचा विश्वास आहे की यामुळे समुद्र शांत रहातो. चांगला पाऊस पडतो. पिक चांगले येते. आणि मच्छीमारांना चांगले मासे मिळतात. या परंपरेला समुहाचा आनंद आणि समृद्धीशी जोडले जाते. अनेक लोकांचे म्हणणे आहे की या परंपरेचे पालन केल्याने सुंदर नवरी मिळते.

या परंपरेमागची कहानी काय?

या परंपरेमागे एक जुनी आदिवासी लोककथा देखील जोडलेली आहे.मान्यतेनुसार आधी चोंटल आणि हुआवे नावाचे दोन स्वदेशी गटा दरम्यान दुश्मनी झाली होती. नंतर चोंटल राजा आणि हुआवे राजकुमारी हीचे लग्न झाले. ज्यामुळे दोन समुदायादरम्यान शांतता स्थापन झाली. आज देखील या परंपरेत शहराचे मेयर चोंटल राजाचा प्रतिनिधीत्व करतात. तर मादी मगर हुआवे राजकुमारीचे प्रतिक मानले जाते. यामुळे या लग्नाला दोन समुदायाच्या एकता आणि बंधुभावाचे प्रतिक मानले जाते.

मादी मगरीला वधू सारखे सजवतता –

लग्नाच्या दिवशी मादी मगरीला वधूसारखे सजवले जाते. तिला पांढरा वेडिंग गाऊन घातला जातो आणि फुले आणि रंगबिरंगी रिबनने सजवले जाते. यानंतर बँड बाजासह या भागात मगर वधूची वरात काढली जाते. या दरम्यान, मगरीला सोबत घेऊन नाचतात आणि उत्सवासारखी ही मिरवणूक काढली जाते. सुरक्षेसाठी मगरीच्या जबड्यांना बांधलेले असते. त्यामुळे लोकांना कोणतीही इजा होत नाही.

लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर सर्वात मोठी परीक्षा जेव्हा येते जेव्हा मेयर या मगर ( वधूचे ) चुंबन घेतात. हा क्षण सर्वाधिक चर्चेत असतो. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केला जातो. हा विधी निसर्गाचे संरक्षण आणि त्यांचा आदर करण्याचे प्रतिक मानले जाते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in