• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या गाण्याच्या शूटिंगमुळे त्रस्त झालेल्या जया प्रदा, रात्रभर झोपल्याच नाही, पण तेच गाणं आजही सुपरहिट

July 30, 2026 by admin Leave a Comment


80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जया प्रदा यांनी आपल्या निरागस अभिनय, उत्कृष्ट नृत्य आणि मोहक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील एका गाण्याच्या शूटिंगमागचा एक रंजक किस्सा त्यांनी नुकताच उलगडला आहे.

1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या शराबी चित्रपटातील 'दे दे प्यार दे' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याच्या शूटिंगपूर्वी त्या प्रचंड तणावाखाली होत्या असे त्यांनी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये सांगितले.

जया प्रदा यांच्या मते, शूटिंगच्या आदल्या दिवशी दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी त्यांना या गाण्यात पूर्णपणे मॉडर्न आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या काळात जया प्रदा यांची ओळख साडी आणि पारंपरिक भारतीय वेशभूषेत दिसणारी अभिनेत्री अशी होती.

त्यामुळे अचानक वेस्टर्न पोशाखात प्रेक्षक त्यांना स्वीकारतील का याची त्यांना मोठी चिंता वाटत होती. या विचारामुळे त्या संपूर्ण रात्र झोपू शकल्या नव्हत्या. मॉडर्न लूकमध्ये आपण कशा दिसू, प्रेक्षकांना हा नवा अंदाज आवडेल का, तसेच समोर अमिताभ बच्चनसारखा मोठा कलाकार असल्याने उत्तम कामगिरी करण्याचा दबावही त्यांच्यावर होता असे त्यांनी सांगितले.

मात्र, कॅमेरा सुरू झाल्यानंतर जया प्रदा यांनी सर्व भीती आणि संकोच बाजूला ठेवत आत्मविश्वासाने गाण्याचे शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर 'दे दे प्यार दे' हे गाणं शराबी चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय गाणं ठरले आणि जया प्रदा यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय व आयकॉनिक गाण्यांपैकी एक बनले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in