• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या आंब्याचा रुबाबच न्यारा,आगाऊ बुकींग करावी लागते, ९ झाडांच्या सुरक्षेसाठी खास ९ गार्ड्स तैनात

May 23, 2026 by admin Leave a Comment


मध्य प्रदेशातील आलीराजपूर जिल्ह्यात एक असा आंबा पिकतो ज्याची सुरक्षा करण्यासाठी खास गार्ड तैनात करण्यात आले आहेत. ९ झाडांच्या सुरक्षेसाठी १० ते ११ सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहे. याचे कारण या आंब्याची किंमत, विशाल आकार, दुर्मिळता आणि खास स्वाद आहे. कारण देशातच नाही तर विदेशात या आंब्याची चर्चा सुरु असते. याची किंमत १५०० ते ३००० रुपये प्रति फळापर्यंत पोहचते. आणि या खास आंब्यासाठी अगोदरच एडव्हान्स बुकींग करावी लागते. या आंब्याचे नाव आहे ‘नूरजहां’ !

मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल आलीराजपूर जिल्ह्यातील जूना कट्टीवाडा गावातील शिव आम फार्म मध्ये नूरजहां या आंब्याची खास पैदास केली जाते.

फार्मचे संचालक किसान भरतराजसिंह जादव सांगतात की नूरजहां या आंब्याचे मूळ अफगाणातील आहे. ६० च्या दशकात त्यांचे दिवंगत पिता रणवीरसिंह जादव यांनी गुजरातच्या बनमाह क्षेत्रातून या आंब्याची रोपे आणली होती. आज भरतराजसिंह यांच्या नूरजहा या आंब्याची नऊ मोठी झाडे आहेत. यांचे आयुष्य २० ते २५ वर्षे आहे.त्यांनी ग्राफींग तंत्राने ११ नवीन रोपे देखील तयार केली आहेत.

आजुबाजुच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आंब्याची शेती करण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्या फार्म सारखे मोठे आणि वजनदार फळ मिळाले नाही. त्याचमुळे हा आंबा आलीराजपूरची खास ओळख बनला आहे.

२ ते ५ किलोचा असतो एक आंबा

नूरजहां आंब्यांना जगातील सर्वात मोठा आंबा म्हणून ओळखले जाते. सामान्यपणे एका फळाचे वजन २ ते ५ किलोग्रॅमपर्यंत जाते. याचा आकार इतका विशाल असतो की एक आंबा संपूर्ण कुटुंबाला पुरतो.

याचा आकर्षक रंग, सुंगध खूपच खास आणि चव एक मधूर असते. याच कारणाने पहिल्या नजरेतच या आंबा लोकांना आकर्षित करतो.मोठ्या शहरांसह परदेशात या आंब्यांना मागणी वाढत चालली आहे.

९ झाडांसाठी ९ गार्ड

नूरजहा आंब्याची सर्वात खास बाब म्हणजे याची दुर्लभता आहे. झाडांवर मर्यादितच फळ लागते. यासाठी प्रत्येक फळ महत्वाचे आणि किमती असते. चोरी आणि नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी फार्म हाऊसवर खास गार्ड तैनात करतात. या फार्म हाऊसवर देखील नऊ झाडांसाठी नऊ गार्ड्स तैनात केले आहेत. एवढी सुरक्षा एखाद्या फॅक्ट्री किंवा बंगला किंवा उद्योग धंद्यांना दिली जाते. मात्र, येथे आंब्यांच्या झाडाला व्हीव्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.

सातासमुद्रापार नूरजहा आंबा जातो

नूरजहा आंब्यांना खास करुन आखाती देशात मागणी वाढत आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE), सौदी अरब,कतार आणि कुवेत सारख्या आखाती देशात भारतीय प्रीमियम आंब्यांना मागणी वाढत आहे. याशिवाय अमेरिका, कॅनडा, युके येथील भारतीय लोक देखील अशा आंब्यांना खास पसंद करतात. सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण पूर्व आशियाई देशात यांना वेगळीच डिमांड आहे. या आंब्याचे निर्मिती कमी होत असल्याने जास्त निर्यात करता येत नाही.

मुघल काळापासूनचा इतिहास

आंब्याची ही नूरजहाँ प्रजात अफगाणिस्तानातून भारतात आली, नंतर ती गुजरातमार्गे माळवा आणि झाबुआ-अलीराजपूर प्रदेशात पोहोचली. मुघल काळात, राजघराण्यांच्या बागांमध्ये मोठ्या आकाराच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या आंब्यांना खूप महत्त्व होते.

आंब्यांचे ‘संग्रहालय’

इथे नूरजहाँ आंबा हा ‘राजा’ असला तरी, हा फार्म म्हणजे आंब्यांचा खजिना आहे. येथे हापूस, लंगडा, केसर, जंबो केसर, बाटली, पायरी, मालगोबा, रॉस, मकरम, बनाना मँगो, गुलाब-ए-खास आणि चंदेरी यांसारख्या डझनभर प्रसिद्ध जातींची लागवड केली जाते. शाही बारामसी आणि राणीराज यांसारख्या दुर्मिळ जातीही येथील प्रमुख आकर्षण आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
  • Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर…
  • Viral Video : रेवती सुळेच्या लग्नात संजय राऊत – जया बच्चन यांचा मराठीत संवाद, बिग बी पहातच राहिले…
  • बंडखोर खासदारांवरील बडतर्फची कारवाई टळली? एकनाथ शिंदेंच्या त्या खेळीने उद्धव ठाकरेंना मोठा झटका
  • बाळासाहेब ठाकरेंची किरण पावसकरांकडून खिल्ली, आता एकनाथ शिंदे कारवाई करणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in