• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या अभिनेत्रीच्या अफेअरची पाकिस्तानमध्ये रंगलेली चर्चा, या दिग्दर्शकाची बनलेली तिसरी पत्नी, कोण आहे ती अभिनेत्री?

June 21, 2026 by admin Leave a Comment


Nigar Sultana Birth Anniversary: हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निगार सुल्ताना . आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. 21 जून 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही खास पैलूंवर एक नजर टाकूयात.

निगार सुल्ताना यांचा जन्म 21 जून 1932 रोजी हैदराबाद संस्थानात झाला. त्या पाच भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या. त्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. त्यांचे वडील सैन्यात मेजर पदावर कार्यरत होते. शालेय जीवनात एका नाटकात सहभागी झाल्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि पुढे त्यांनी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानी अभिनेत्यासोबत नाव जोडले गेले

निगार सुल्ताना यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही त्या काळात मोठी चर्चा झाली होती. त्यांचे नाव पाकिस्तानी अभिनेते दर्पण कुमार यांच्याशी जोडले जात होते. या अफवांनी इतके मोठे रूप घेतले की 1959 मध्ये त्यांना पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. त्या वेळी त्यांनी दर्पण कुमार यांच्यासोबतच्या कथित नात्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले होते.

निगार सुल्ताना यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपट ‘मुघल-ए-आझम’ मधील ‘बहार’ या दरबारी नर्तिकेच्या भूमिकेमुळे. या चित्रपटात मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. विशेष म्हणजे, निगार सुल्ताना या दिग्दर्शक के. आसिफ यांच्या प्रेमात पडल्या आणि पुढे दोघांनी विवाह केला. हा के. आसिफ यांचा तिसरा विवाह होता. या दाम्पत्याला एक मुलगी झाली, तिचे नाव हिना असे ठेवण्यात आले.

2000 मध्ये झाले निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील या प्रतिभावान अभिनेत्रीचे 21 एप्रिल 2000 रोजी मुंबई येथे निधन झाले. आपल्या अभिनयाने आणि संस्मरणीय भूमिकांनी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अजरामर स्थान मिळवले. आजही ‘मुघल-ए-आझम’मधील बहारची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे आणि निगार सुल्ताना यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण इतिहासात आदराने घेतले जाते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: सुट्या तेलावर तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय, अखेर मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप; फडणवीस म्हणाले..
  • कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, घेतला मोठा निर्णय
  • देशावर नवे संकट! थेट मंत्री आयसीयूमध्ये, H1N1 फ्लूची नेमकी लक्षणे काय?
  • मोठी बातमी! राज्यात घडामोडींना वेग, विरोधी पक्षाचे खासदार घेणार फडणवीसांची भेट
  • Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे… साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in