• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

याला म्हणतात डोकं, फ्रिजसाठी कापसाचा भन्नाट जुगाड, वापरल्यानंतर वीज बिल येते कमी

July 18, 2026 by admin Leave a Comment


घरातील फ्रिज हे असे उपकरण आहे, जे दिवसाचे 24 तास सुरू असते. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेत अगदी थोडीशी घट झाली तरी विजेचा वापर वाढू शकतो. अनेकजण फ्रिज जुना झाल्यामुळे किंवा हवामानातील बदलामुळे वीज बिल वाढत असल्याचे मानतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर फ्रिजची कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे तो उपाय? जाणून घ्या सविस्तर

फ्रिजच्या दाराभोवती असलेले रबर, ज्याला ‘गॅस्केट’ म्हटले जाते, हे थंड हवा आत टिकवून ठेवण्याचे आणि बाहेरील गरम हवा आत जाण्यापासून रोखण्याचे महत्त्वाचे काम करते. कालांतराने या रबरामध्ये धूळ, अन्नाचे सूक्ष्म कण, तेलकट थर, चिकटपणा आणि बुरशी जमा होते. त्यामुळे रबराची पकड कमी होते आणि दार पूर्णपणे बंद होत नाही. अशा परिस्थितीत थंड हवा बाहेर पडते आणि आवश्यक तापमान कायम ठेवण्यासाठी फ्रिजचा कंप्रेसर अधिक वेळ चालू राहतो. परिणामी विजेचा वापर वाढण्याची शक्यता निर्माण होते.

कापसाचा उपाय काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दाखविल्यानुसार, सर्वप्रथम थोडासा कापूस घ्यावा. तो हलकासा डेटॉलमध्ये भिजवून एका बारीक काठीच्या टोकाला गुंडाळावा. त्यानंतर फ्रिजच्या दाराच्या रबरामधील सर्व भाग, विशेषतः कोपरे आणि घडी पडणाऱ्या जागा, काळजीपूर्वक स्वच्छ कराव्यात.

या प्रक्रियेमुळे रबरामध्ये साचलेली घाण, बुरशी आणि चिकट थर दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रबर पुन्हा व्यवस्थित बसते आणि दार अधिक घट्ट बंद राहण्यास मदत मिळू शकते.

या उपायामुळे कोणते फायदे होऊ शकतात?

व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, फ्रिजच्या रबराची नियमित स्वच्छता केल्यास पुढील फायदे मिळू शकतात.फ्रिजमधील थंड हवा कमी प्रमाणात बाहेर जाते. कंप्रेसरवरील अतिरिक्त ताण कमी होऊ शकतो. विजेचा वापर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. फ्रिजमध्ये दुर्गंधी निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. बुरशी आणि जंतूंची वाढ रोखण्यास मदत मिळते. अतिरिक्त बर्फ साचण्याची शक्यता कमी होऊ शकते. फ्रिजची कार्यक्षमता अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते.

सूचना : वरील माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. या उपायामुळे वीज बिल निश्चितच कमी होईल किंवा सर्वच फ्रिजमध्ये समान परिणाम दिसून येतील, असा कोणताही वैज्ञानिक दावा करण्यात आलेला नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिनेत्याने ऑनस्क्रीन वहिनीलाच बनवलं पत्नी; पतीपेक्षा चौपट कमावू लागल्याने आलेला दुरावा
  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in