• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यशस्वी जयस्वाल 9 वर्षांनी मोठ्या असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? Video Viral

July 27, 2026 by admin Leave a Comment

सोशल मिडिया म्हणजे मुक्त व्यासपीठ.. या व्यासपीठावर कधी कोणासोबत सूत जुळवलं जाईल सांगता येत नाही. खासकरून सेलिब्रेंटींच्या बाबतीत सोशल मीडियायवर कायम धुराळा उडत असतो. त्यांच्या खासगी आयुष्याबाबत आणि माहित नसलेल्या घटनांबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगतात. क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल अशाच एका चर्चेमुळे प्रकाशझोतात आला आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे नेटकरी त्याचं नातं 33 वर्षांच्या एक बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडत आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मृणाल ठाकुर आहे.. या दोघांमध्ये अफेयर आणि डेटिंगच्या वावड्या आता सोशल मीडियावर उठल्या आहे. सध्या एका व्हायरल व्हिडीओवरून नेटकरी हा अंदाज बांधत आहेत. एका कॅफेबाहेरचा व्हिडीओ यासाठी निमित्त ठरला आहे.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री मृणाल ठाकुर आधी कॅफेतून बाहेर पडते. त्यानंतर थोड्या वेळाने भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल बाहेर येतो. यशस्वी जयस्वाल कॅफेतून बाहेर पडल्यानंतर थेट कारमध्ये बसतो आणि रवाना होतो. खरं तर या व्हिडीओत इतकंच आहे. तरीही नेटकरी काय अंदाज बांधतील याचा नेम नाही. हे दोघे या कॅफेत एकत्र येणं हा केवळ एक योगायोग होता का? पण या चर्चांवर दोघांनीही भाष्य केलं नाही. त्यामुळे जो तो आपल्या पद्धतीने या चर्चा रंगवत आहे. यशस्वी जयस्वाल हा 24 वर्षांचा, तर मृणाल ठाकुर ही 33 वर्षांची आहे. या दोघांमध्ये जवळपास 9 वर्षांचा फरक आहे. त्यामुळे या चर्चा निरर्थक वाटत असल्या तरी सोशल मीडियावर रान पेटलं आहे.

Yashasvi Jaiswal dating Mrunal Thakur?😳 pic.twitter.com/dnr4FNSaEc

— Wickets Hitting (@offpacedelivery) July 26, 2026

यशस्वी जयस्वालचं कोणासोबत नाव जुळण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वी युकेच्या मॅडी हॅमिल्टनसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. तेव्हाही अनेकांनी त्याची प्रेयसी असल्याचं सांगितलं होतं. पण त्यावर यशस्वी जयस्वालने अधिकृतपणे कधीच भाष्य केलं नाही. दुसरीकडे, मृणाल ठाकुरचं नाव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुषसोबत जोडलं गेलं आहे. त्यांच्या लग्नाच्या अफवाही उडाल्या होत्या. मात्र दोघांनीही या बातम्यांचं खंडन केलं आणि धुराळा शांत झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in