• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

….म्हणून मग आम्ही हायकोर्टाच्या कॅन्टीनची तपासणी केली, तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा

August 8, 2026 by admin Leave a Comment


काही दिवसांपूर्वी एफडीएकडून हायकोर्टाच्या कॅन्टीची तपासणी करण्यात आली होती, हे प्रकरण चांगलंच चर्चेमध्ये आलं होतं. त्यानंतर हायकोर्टाकडून मंत्रालयाच्या कॅन्टीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. हायकोर्टाच्या आदेशानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या कॅन्टीनची तपासणी करण्यात आली, तपासणी दरम्यान मंत्रालयाच्या कॅन्टीमध्ये अस्वच्छता आढळून आली, यावर नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने एफडीएची चांगलीच कानउघडणी केली होती. दरम्यान यावर एका मुलाखतीमध्ये बोलताना तुकाराम मुंढे यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले मुंढे?

हायकोर्टाच्या कॅन्टीमध्ये इंस्पेक्शन झाल ते नियमानुसार करण्यात आलं . ज्या दिवशी हायकोर्टाच्या कॅन्टीची तपासणी झाली, त्याच्या आदल्या दिवशी हायकोर्टात सुनावणी झाली होती. त्या सुनावणीत तुम्ही फक्त खासगी कॅन्टीनची तपासणी करता का? की शासकीय कॅन्टनची पण तपासणी करता? असा सवाल  हायकोर्टाने एफडीएला केला होता. यावर उत्तर देताना आम्ही सांगितलं की आम्ही सगळीकडेच तपासणी करतो, तेव्हा मग हायकोर्टाने सांगितलं आमच्याकडे पण आहे.  मग आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तपासणी केली, माझ्यापण कार्यालयात  तपासणी झाली आहे,  एफडीएच्या पण कॅन्टीनची तपासणी करण्यात आली आहे, असं यावेळी मुंढे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान तुकाराम मुंढे यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला की एखाद्या डिशमध्ये कॉक्रोच आला तर काय होतं ? असं तुम्हाला कारवाई करताना कोणी म्हणत नाही का? या प्रश्नाला तुकाराम मुंढे यांनी मिश्किल उत्तर दिलं. कॉक्रोच काय असत? हे आपण पाठीमागच्या काही दिवसात बघितलं आहे. कॉकरोच काय असतं हे आपल्याला पाठीमागच्या दिवसात कळलं आहे. त्याला तुम्ही कुठेही फिरवा, तो तिथून जन्म घेतो असं यावर तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.  दरम्यान या पुढची कारवाई आता चायनीज पदार्थांवर असेल, असा संकेत देखील यावेळी मुंढे यांच्याकडून देण्यात आला आहे. खाद्यपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ कदापीही खपवून घेणार नाही, असा इशाराही या मुलाखतीदरम्यान त्यांनी दिला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जरांगेंचं आंदोलन, ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया; दोन नेते काय म्हणाले?
  • Snakes: घरातील या गोष्टी सापाला करतात आकर्षित, आताच काढून टाका अन्यथा…
  • सर्वात मोठी बातमी ! राधाकृष्ण विखेंना हटवा… जरांगेंच्या आंदोलनाआधीच मुख्यमंत्र्यांना पत्र; मोठ्या घडामोडींना वेग
  • Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
  • माझ्या बापाने पण एवढं kiss नाही केलं; आरोप करणाऱ्या श्रेयाला राम कपूरचे सडेतोड उत्तर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in