• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! NEET पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला थेट क्लीनचीट, CBI म्हणाली पुरावे सापडले नाही; मोठी अपडेट समोर!

July 23, 2026 by admin Leave a Comment


NEE Paper Leak 2024 : सध्या देशात नीट पेपर लीकचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. याच पेपर फुटीचा मुद्दा घेऊन कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातू उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी आंदोलकांकडून केली जातेय. आता सीजेपीने 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. एकीकडे यंदाच्या नीट पेपरफुटीमुळे देशातील वातावरण ढवळून निघालेले असताना 2024 सालच्या नीट पेपर लीकमधील आरोपीस क्लीनचीट देण्यात आली आहे.

संजीव मुखिया याला केलं होतं अटक

मिळालेल्या माहितीनुसार नीट यूजी 2024 च्या परीक्षा पेपर लीक प्रकरणातील मास्टरमांईंड म्हणून समोर आलेल्या संजीव कुमार उर्फ संजीव मुखीय या आरोपीला सीबीआयने क्लीनचीट दिली आहे. सीबीआयने गुरुवारी संजीव मुखिया यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असं सांगितलं आहे. नीट यूजी 2024 पेपरफुटी प्रकरणात बिहार पोलिसांनी नांलंदाचा रहिवासी असलेल्या संजीव मुखिया याला आरोपी म्हणून अटक केलं होतं. सुरुवातीला तो काही दिवस फरार होता. नंतर त्याला अटक करून त्याची चौकशी केली होती. पुढे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

सीबीआयने नेमकं काय सांगितलं?

सीबीआयने गुरुवारी 2024 सालच्या पेपरफुटीवर सविस्तर भाष्य केलं. या प्रकरणात अगोदर आम्हाला संजीव मुखिया यांच्यावर संशय आला होता. कारण अन्य काही पेपरफुटी प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याचे एफआयआरमध्येही नाव लिहिण्यात आले होते. पुढे तपासात मात्र त्याच्याविरोधात पुरावे आढळले नाहीत, असं सीबीआयने सांगितलं.

2024 सालचं पेपरफुटी प्रकरण काय होतं?

2024 साली नीट यूजी परीक्षेत पेपरफुटी झाली होती. पाटण्यात एका शाळेच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांकडे या परीक्षेचा पेपर अगोदरच पोहोचला होता. पेपरफुटीचे हे प्रकरण समोर आल्यानंतर बिहार पोलिसांनी काही विद्यार्थी तसेच पेपरफुटी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणात सुरुवातीला संजीव मुखिया याचे नाव मास्टरमाईंड म्हणून समोर आले होते. सर्वात अगोदर झारखंडमधील हजारीबाग येथून हा पेपर लीक करण्यात आला होता. त्यानंतर लाखो रुपये घेऊन नंतर हा पेपर वाटण्यात आला होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in