• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! सामूहिक राजीनाम्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ, नेमकं कारण काय?

May 27, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सामूहिक राजीनाम्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. गडचिरोली काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदलल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. कारण गेल्या काही काळापासून काँग्रेसची लोकप्रियता कमी झाली आहे, सध्या पक्ष उभारी घेण्याचा प्रयत्न करत असताना गडचिरोलीत पक्षाला हा मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गडचिरोली काँग्रेसमध्ये खळबळ

समोर आलेल्या माहितीनुसार, जवळपास मागील कार्यकाळात चार वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष म्हणून महेंद्र ब्राह्मणवडे यांच्याकडे पक्षाच्या कारभार होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने अनेक जिल्हाध्यक्षांना पदावरून काढून टाकत नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली होती. त्यामुळे गडचिरोलीचे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून विश्वजीत कोवासे यांची निवड करण्यात आली होती. मात्र ही निवड पदाधिकाऱ्यांना पटलेली नाही.

पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीमुळे जुने कार्यकर्ते व तालुकाध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबई येथे भेट घेतली. आम्हाला जुना जिल्हाध्यक्ष हवा अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व दहा तालुक्यातील अध्यक्षांनी घेतली. यामुळे नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीमुळे सध्या गडचिरोली काँग्रेसमध्ये वातावरण तापलेले आहे. या नवीन निवडीचा निषेध करत तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत, मात्र प्रदेशाध्यक्षांनी हे राजीनामे अद्याप स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा जिल्हाध्यक्ष बदलला जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून देशातील प्रमुख राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, त्यामुळे काँग्रेसचे राजकीय महत्त्व कमी झालेले आहे. अनेक राज्यांमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली असली तरी पक्षाचे अद्याप कमबॅक झालेले नाही. सध्या काँग्रेसला पक्ष संघटन वाढण्याची गरज आहे. मात्र जर गडचिरोलीसारखी नाराजी पक्षात असेल तर आगामी काळात पक्षाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in