• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर अडचणीत, तरूणीने गंभीर आरोप करत पोलिसात नोंदवली तक्रार

June 23, 2026 by admin Leave a Comment


भारतीय क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून ओपनिंग करणारा अभिषेक पोरेल याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एक तरूणीने त्याच्यावर गंभीर आरोप केल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सदर मुलीने तक्रार दाखल करताना आरोप केले की, त्याने लग्नाचं वचन दिलं होतं आणि फसवणूक केली. इतकंच काय तर लिव इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं देखील तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे. अभिषेक पोरेलविरुद्ध हुगली जिल्ह्यातील मगरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसात दाखल झालेल्या या तक्रारीनंतर क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, या आरोपात काहीच तथ्य नसल्याचं अभिषेक पोरेल याने सांगितलं आहे. पण या आरोपांमुळे अभिषेक पोरेलचं क्रिकेट करिअर संकटात येण्याची शक्यता वाढली आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सदर तरूणीने सांगितलं की, अभिषेक पोरेलसोबत तिचे 3 वर्षांपासून संबंध होते. त्यानंतर लग्नापर्यंत नातं पोहोचलं होतं. पण गेल्या दीड वर्षांपासून नात्यात समस्या सुरू झाल्या. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात पोहोचलं होतं. आता पोलिसात तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी तपास सुरू झाला आहे. “आम्हाला तक्रार मिळाली असून आम्ही तपास सुरू केला आहे,” अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. सदर तरूणीने धमकावणे आणि मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे अभिषेक पोरेलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अभिषेक पोरेलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. इतकंच काय तर पोलिसांनी कोणताही संपर्क साधलेला नाही. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावरच या प्रकरणावर बोलेन असंही त्यांनी सांगितलं आहे.

डावखुरा फलंदाज असलेला अभिषेक शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघासाठी ओपनिंग करतो. त्याच्या फ्रेंचायझी प्रत्येक पर्वासाठी 4 कोटी रूपये मोजते. या आरोपानंतर त्याच्या प्रोफेशनल करिअरवर प्रभाव पडू शकतो. अभिषेक पोरेल आता 23 वर्षांचा असून दिल्ली कॅपिटल्स संघाने संधी दिली. अभिषेक शर्मा मागच्या चार पर्वापासून दिल्ली कॅपिटल्स संघासोबत आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून 35 सामन्यात 25.63 च्या सरासरीने 769 धावा केल्या आहेत. पोरेलने आयपीएल स्पर्धेत 4 अर्धशतकं ठोकली आहेत. अभिषेक पोरेल बंगालसाठी 32 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एक शतकाच्या मदतीने 1408 धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए समन्यात 43हून अधिकच्या सरासरीने 833 धावा केल्यात. यात दोन शतकं आणि पाच अर्धशतकांचं समावेश आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
  • Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?
  • नवी मुंबईत दूध भेसळीचा पर्दाफाश, भेसळयुक्त दूध जप्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in