• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृ्त्यू

August 7, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 41 वर्षीय कॉन्स्टेबल गणेश रायते यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गणेश रायते गॅलेक्सी अपार्टनेंटबाहेर तैणात होते अशी माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गॅलेक्सी बाहेर गार्ड ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका

समोर आलेल्या माहितीनुसार, गणेश रायते हे गॅलेक्सी बाहेर गार्ड ड्युटीवर तैनात असताना संध्याकाळी सहा वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तत्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गणेश रायते मुंबई पोलिसांच्या LA 4 मध्ये कार्यरत होते. ते लष्करातून मुंबई पोलिसांमध्ये भरती झाले होते अशीही माहिती समोर आली आहे.

आसाममधील पुरग्रस्तांसाठी सलमान खान सरसावला

आसाममध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हजारो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या कठीण काळात अनेक व्यक्ती आणि संस्था मदतकार्य करत आहेत. अशातच एका अहवालानुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पूरग्रस्त आणि बेघर झालेल्या नागरिकांसाठी 500 अर्धपक्की घरे उभारण्याच्या उद्देशाने एका स्वयंसेवी संस्थेसोबत (NGO) हातमिळवणी केल्याचा दावा करण्यात आला आहे.

500 अर्धपक्की घरे उभारणार

सलमान खानची ‘बीइंग ह्यूमन’ ही संस्था यापूर्वीही आपत्तीग्रस्त भागांमध्ये गरजूंना अन्नपुरवठा करण्याचे काम करत आली आहे. आता या अहवालानुसार, मदत मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली असून, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनावर विशेष भर दिला जात आहे. गेल्या अनेक दशकांतील सर्वात भीषण पुराचा सामना करणाऱ्या असममध्ये बेघर झालेल्या कुटुंबांसाठी 500 अर्धपक्की घरे उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सलमानच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • iQOO ने भारतात लाँच केला 7050 mAh बॅटरी असलेला नवीन 5G फोन, जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता
  • रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं…
  • वरलक्ष्मी व्रताचा शुभ दिवस, धनप्राप्तीसाठी करा ‘हे’ 3 सोपे उपाय
  • जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
  • 4 कॅमेरे अन् 5000mAh बॅटरी; Samsung चा 5G फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या ऑफर किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in