• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! शिंदे गट भाजपात विलीन होणार? एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर? त्या ट्विट्ने मोठी खळबळ

June 20, 2026 by admin Leave a Comment


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.  दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जवळपास अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य़मंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले.

या फुटीनंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे यावेळी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. हे सर्व खासदार आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.  या खासदारांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर केंद्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचं बळ वाढणार आहे. मात्र आता या सर्व घडामोडी सुरू असतानाच ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी केलेल्या या ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे, त्यांनी मोठा दावा केला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गमंत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा. राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते. बघूया काय काय घडतंय ?’ असं ट्विट असीम सरोदे यांनी केलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in