• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! विलास घुले हत्याप्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती, एसआयटीला मोठं यश, आरोपीच्या शेतात काय काय सापडलं?

June 28, 2026 by admin Leave a Comment


काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. दोन गटात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले नावच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. विलास घुले हा हॉटेल व्यावसायिक होता. दरम्यान विलास घुले यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी विलास घुले याच्या कुटुंबाची भेट घेतली होती, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती,  दरम्यान या प्रकरणात एसआयटी देखील नियुक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा एसआयटीकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणात बीडचे  खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सैरव सोनवणे याच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सैरव सोनवणे याची एसआयटीकडून चौकशी देखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे विलास घुले हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे, त्यामुळे आता तपासाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि चाकू एसआयटीकडून जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावर ज्या चार चाकी गाडीने आरोपी दाखल झाले होते, ती पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी एसआयटीने जप्त केली आहे.  तर ज्या चाकुने विलास घुलेंवर वार करण्यात आला तो चाकू देखील आरोपीच्या शेतातून एसआयटीने जप्त केला आहे. दरम्यान आता विलास घुले हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा एसआयटीच्या हाती लागल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

विलास घुले हा एक हॉटेल व्यावसायिक होता, दोन गटात भांडण सुरू होते, त्यामुळे तो मध्यस्थी करण्यासाठी गेला होता, त्यावेळी आरोपीने त्याच्यावरच हल्ला केला. धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्यामुळे या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता, या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?
  • सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in