• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! राजकारणात मोठा भूकंप, भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

September 7, 2026 by admin Leave a Comment


लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतर देखील भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरूच आहे. इंडिया आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि एनडीएमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाले. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. सर्वाधिक पक्ष प्रवेश हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात झाले आहेत. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याचं पहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार हिरा ठाकुर यांनी सोमवारी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आता लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. जातीआधारीत जनगणनेच्या आधारावर अनुसूचित जाती, जमातीसोबत मोठा धोका झाला आहे, त्यामुळे आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी हिरा ठाकुर यांनी म्हटलं आहे.

हिरा ठाकुर यांनी काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी राजेंद्र पाल गौतम, पक्षाचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद आणि खासदार राकेश राठोड यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद यांनी हिरा ठाकुर यांच पक्षात स्वागत केलं. यावेळी अनिल जयहिंद यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने जातीआधारीत जनगणनेच्या आधारावर अनुसूचित जाती, जमातीसोबत मोठा धोका केला आहे, असं यावेळी अनिल जयहिंद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हिरा ठाकुर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कर्पूरी ठाकुर यांचं स्मरण करताना म्हटलं की, कर्पूरी ठाकुर हे देशातील असे पहिले नेता होते, ज्यांनी बिहारमधील मागासवर्गीय लोकांना सर्वात पहिल्यांदा आरक्षण दिलं. मात्र अजूनही अनेक लोक आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचं देखील स्वागत केलं आहे.

बारा वर्ष विधान परिषदेचे सदस्य

दरम्यान हिरा ठाकुर हे तब्बल बारा वर्ष विधान परिषदेचे सदस्य होते. तसेच ते उत्तर प्रदेश राज्याच्या मागास वर्ग आयोगाचे उपाध्यक्ष देखील होते. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त होता. त्यांनी अनेकदा मागास वर्ग आयोच्या विविध समस्यांवर आक्रमक आंदोलनं देखील केली आहेत. तसेच राष्ट्रीय कर्पूरी ठाकुर विचार मंच नावाची संघटना देखील ते चालवतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • South Africa ODI Squad: दक्षिण अफ्रिकेने संघातून काढल्यानंतर वादाला फोडणी, नेमकं काय झालं?
  • Bigg Boss 20 : ‘बिग बॉस’ च्या या स्पर्धकाला बनायचं होतं ट्रक ड्रायव्हर, अवघ्या अर्ध्या तासात..
  • लिफ्टमध्ये शूट झालं गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की 41 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, ऐकताच लोक…
  • आता इराणची थेट दक्षिण कोरियाला मोठी धमकी, तुम्ही जर अमेरिकेची मदत केली तर आम्ही…, तणाव वाढला
  • रिल बनवायला गेला, असा कुदला आणि दोन्ही पाय तोडून बसला…मुर्खपणा चांगलाच भोवला!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in