• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ…

August 11, 2026 by admin Leave a Comment


सांगली जिल्ह्यातील विटा शहराकडे येत असताना आंबेगावजवळ मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांना धडक बसल्याची घटना घडली. जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली. विशेष म्हणजे, जखमी कार्यकर्त्याला मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रुग्णालयात दाखल केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा आज सांगता होत आहे. त्यानिमित्त सांगली जिल्ह्यातील विटा येथे त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. ढोल-ताशा आणि झांज पथकाच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच तब्बल 30 जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली.

स्वागतासाठी जमलेल्या मोठ्या गर्दीमुळे जरांगे यांच्या ताफ्यातील दोन ते तीन वाहनांना धडक बसली. या घटनेत एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली. जखमी कार्यकर्त्याला सुरुवातीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune News : त्यांनी मारलं हो पोरीला…पुण्याच्या शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिलांच्या आरोपांनी एकच खळबळ!
  • कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले डोंबिवलीचे सुभेदार नेपाळपुरात बेपत्ता?, संपर्क तुटल्याने पित्याच्या शोधासाठी मुलाची धावाधाव
  • धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की… श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
  • यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
  • मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट… नेमकं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in