• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भारत पहिल्यांदाच खंबिरपणे इराणच्या पाठिशी, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका, थेट अमेरिकेच्या नाकावर टिच्चून…

June 12, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच आहे. बुधवारी इराणकडून अमेरिकेच्या तब्बल 22 सैन्य तळांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इराणवर थेट मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद आहे. याचा मोठा फटका हा जगातील अनेक देशांना बसत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज हा असा मार्ग आहे, ज्या मार्गाने जगातील तब्बल 25 टक्के इंधनाची वाहतूक होते. दरम्यान आता स्ट्रेट ऑफ होर्मुज पुन्हा एकदा वाहतुकीसाठी ओपन व्हावा आणि व्यापारी जहाजांना सुरक्षा मिळावी, यासाठी अमेरिकेनं पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे, जर इराणसोबत चर्चेमधून स्ट्रेट ऑफ होर्मुज संदर्भात तोडगा न निघाल्यास अमेरिकेकडून स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये विविध देशांचं संयुक्त सैन्य तैनात करण्यावर विचार सुरू आहे.

या संदर्भात फ्रान्समध्ये 19 जून रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. भारतानं देखील या सैन्य कारवाईमध्ये सहभाग घ्यावा यासाठी अमेरिका आणि तिच्या इतर सहकारी देशांकडून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु भारतानं अमेरिकेला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की, आम्ही स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही. हा अमेरिकेसाठी भारतानं दिलेला मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकारच्या समस्या या चर्चेनंच सोडवल्या जाव्यात, ही आमची भूमिका असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये बैठक पार पडणार आहे, या बैठकीमध्ये भारत स्ट्रेट ऑफ होर्मुज संदर्भातील आपली भूमिका मांडणार आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुज सुरू करण्यासंदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला फ्रान्सकडून मध्य पूर्वेतील देश कतार, इजिप्त, सौदी अरेबिया, युएई या देशांना आमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीत अमेरिकेसह भारत देखील सहभागी होणार आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही आमचं सैन्य पाठवणार नाही, हे आधीच भारतानं स्पष्ट केलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हिंदू धर्माची पताका अविरत फडकत राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
  • Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in