• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या…अभिजीत दीपकेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

July 30, 2026 by admin Leave a Comment


नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी परतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत आंदोलनादरम्यान धमक्या मिळाल्याचा दावा केला.

अभिजीत दीपके यांनी सांगितले की, आंदोलन सुरू असताना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. “मला अनेक ऑफर्स देण्यात आल्या. भाजपमध्ये सामील व्हा, अन्यथा आंदोलन मागे घ्या, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच आंदोलन सुरू ठेवल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या,” असा आरोप त्यांनी केला. या धमक्यांमध्ये त्यांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी दीपके म्हणाले की, “माझ्या आई-वडिलांनाही घरी जाऊन पाहून घेऊ, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या. मी वयाने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचा आहे. अशा वयाच्या तरुणाला धमक्या देणे योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी केलेले सर्व आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावले आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अभिजीत दीपके यांचे आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. “भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी कोणालाही धमक्या दिल्या जात नाहीत. आंदोलनामुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर भाजपवर विनाकारण आरोप करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे ते म्हणाले.

उपाध्ये यांनी पुढे स्पष्ट केले की, भाजपकडून कोणतीही अधिकृत ऑफर देण्यात आल्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. जर अशा प्रकारचा दावा केला जात असेल, तर त्यासंदर्भातील ठोस पुरावे समोर आणावेत, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या आरोपांमुळे आणि भाजपच्या प्रत्युत्तरामुळे या प्रकरणावर राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in