• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! पुन्हा एका विमानाचा भीषण अपघात, उड्डाण करताच कोसळलं, धुराचे लोट अन् प्रचंड आवाज..

June 29, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर आली आहे, विमानाचा भीषण अपघात झाला आहे, प्रशिक्षणार्थी विमान जमिनीवर कोसळलं आहे. या घटनेत एक ट्रेनी महिला पायलट जखमी झाली आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच तातडीने स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या पायलटला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी आगरा येथे हलवण्यात आलं आहे.दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, ही दुर्घटना घडल्यानंतर आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून विमान अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील कासगंजमध्ये हा अपघात घडला आहे, जेव्हा हा अपघात घडला, तेव्हा घटनास्थळी प्रचंड धुराळा उडाला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या विमानामध्ये एक ट्रेनी पायलट होती, तिने विमानाचं उड्डाण केलं मात्र त्यानंतर काही वेळातच शहरातील पोलीस लाईनच्या पाठिमागे असलेल्या लेन हायवेवर हे विमान कोसळलं. हे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे घटनास्थळी मोठा आवाज झाला, हा आवाज नेमका कशाचा होता, हे पाहाण्यासाठी स्थानिक लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा विमानाचा अपघात झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

या अपघातामध्ये ट्रेनी महिला पायलट गंभीर जखमी झाली आहे. विमानाचा अपघात घडताच स्थानिक लोकांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली, या ट्रेनी पायलटला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली, घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि बचाव पथक देखील घटनास्थळी हजर झालं. ही घटना नेमकी कशामुळे झाली, अपघाताचं नेमकं कारण काय होतं हे अजूनही समोर आलेलं नाहीये, विमान अपघाताच्या कारणाचा शोध सुरू असल्याची माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली आहे. ट्रेनी पायलटने विमानाचं उड्डाण केलं आणि त्यानंतर अवघ्या काही वेळेतच हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कुठलीही जिवीन हानी झाली नसली तर विमानाचं प्रचंड नुकसान झालं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in