• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! पुण्यात धाड-धाड गोळीबार… भाजप कार्यकर्त्याला संपवलं, देहुरोड हादरलं

April 28, 2026 by admin Leave a Comment


चारच दिवसांपूर्वी पुण्यातील वारजे परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पुण्याचे देहुरोड गोळीबाराच्या धाड.. धाड..आवाजाने हादरले आहे. देहुरोड शहरात अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात एकाचा तरुणाच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. रमेश रेड्डी हा भाजपाचा स्थानिक कार्यकर्ता असल्याचे म्हटले जात असून परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पुणे मावळ येथील देहुरोड शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात रमेश रेड्डी याच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच देहुरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे – मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न

भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यांच्या नऊ राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्यांना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. रमेश रेड्डी यांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करीत जुना पुणे – मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला.

दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली

परंतू देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेप नंतर रमेश रेड्डी याचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविला. तर रमेश रेड्डी याच्यावरील हल्ला झाल्याचे कारण पोलीस तपासात समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आता तणावपूर्ण शांतता आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…
  • Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
  • Pankaja Munde | मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून रद्द
  • MI vs SRH : पराभवाची मालिका रोखण्यासाठी पलटणमध्ये बदल निश्चित, ओपनरचा पत्ता कट! प्लेइंग 11 मध्ये कुणाला संधी?
  • MI vs SRH : हैदराबाद नवव्या सामन्यासाठी सज्ज, पलटण विरुद्ध परतफेड करण्याची संधी, मुंबई कमबॅक करणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in