• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच… नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

August 1, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आज जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनात्मक विषयांसह सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावरही चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबत न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. तसेच, कोणत्याही परिस्थितीत हे चिन्ह दुसऱ्या गटाकडे जाणार नाही, गरज पडल्यास ते गोठवले जाऊ शकते, असेही त्यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर 2022 पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची नुकतीच सुनावणी पार पडली असून, अंतिम निर्णयाकडे राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक तयारी मजबूत ठेवण्याच्या सूचना दिल्याचेही सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in