• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना पदावरून हटवलं, आता नव्या अधिकाऱ्याकडे कार्यभार

June 23, 2026 by admin Leave a Comment


धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून दररोज राज्याच्या विविध भागात धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे. भेसळयुक्त पदार्थ बाजारातून हटवले जात आहेत, दोषींवर कठोर कारवाई सुरू आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत आहेत. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

तुकाराम मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदावरून हटविले

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तुकाराम मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदावरून हटविण्यात आले आहे. मात्र, ते अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदावर कायम असणार आहेत. मुंढे यांची 23 फेब्रुवारी 2026 रोजी परभणीच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाच्या प्रधान सचिव पदाचा कार्यभार होता.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे पालक सचिव

तुकाराम मुंढे यांची कालांतराने त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे आता त्यांच्याकडील पालक सचिव पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. आता सरकारने परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती केली आली. पुलकुंडवार सध्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव आहेत. त्याचबरोबर अकोला जिल्ह्याच्या पालक सचिवपदावर आता परिमल सिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे. आधी ही जबाबदारी सौरभ विजय यांच्याकडे होती.

पालक सचिव म्हणजे काय?

पालक सचिव पदावरील अधिकारी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि कल्याणकारी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही यावर पालक सचिवांचे लक्ष असते. यासाठी पालक सचिव वर्षातून किमान चार वेळा जिल्ह्याचा दौरा करावा लागतो, तसेच योजनांचा आढावा घेणे, अडचणी ओळखून उपाययोजना सुचवणे आणि शासनाला अहवाल सादर करणे हे काम पालक सचिवाला करावे लागते.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हजारो वर्षांपूर्वी फ्रिज नसताना लोक अन्न कसे सुरक्षित ठेवत होते? पद्धत ऐकून तुम्ही व्हाल हैराण
  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in