
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 26 तारखेला मुंबईत संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी राज ठाकरेंची उद्या सकाळी पत्रकार परिषद होणार आहे. यात या संयुक्त मोर्चाबाबत माहिती दिली जाणार आहे. या आधी मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते, आता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे दोघे एकत्र येणार आहेत. त्यामुळे या संयुक्त मोर्चाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार
दिल्लीतील जंतर मंतरवर अभिजीत दिपके आंदोलन करत आहेत. या आंदोलना ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिलेला आहे. आता या दोन्ही नेत्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे यावर काही बोलत नाहीत, आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातो, या सर्व घडामोडीं विरोधात आता ठाकरे बंधुंनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply