• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! कॉक्रोच जनता पार्टीला भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, अभिजीत दिपकेंच्या अडचणी वाढल्या, आंदोलन बंद होणार?

May 24, 2026 by admin Leave a Comment


भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतामधील तरुणाई ही झुरळासारखी असल्याचं म्हटलं होतं. सरन्यायाधीशांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी देशात कॉक्रोच जनता पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना करण्यात आली. अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कॉक्रोच जनता पार्टीची कुठेही नोंद करण्यात आलेली नाही, परंतु हे एक ऑनलाईन आंदोलन आहे. या आंदोलनाला भारतामधील तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच या कॉक्रोच जनता पार्टीच्या फोलोअर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. मराठी तरुण असलेल्या अभिजीत दिपके यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान यापूर्वीच कॉक्रोच जनता पार्टीचं भारतामधील ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं, तसेच इन्स्टाग्राम अकाऊंट देखील हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान त्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीला भारतामध्ये आणखी एक मोठा झटका बसला आहे.

तो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सुप्रिम कोर्टाकडून करण्यात आलेल्या टिप्पणीचा या संघटनेनं चुकीचा आणि व्यावसायिक वापर केल्याचा आरोप देखील या याचिकेत करण्यात आला आहे. एवढंच नाही तर जे वकील खोट्या आणि बनावट पदव्यांच्या आधारे वकिली व्यवसायात कार्यरत आहेत, अशा सर्व वकिलांची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे, त्यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कॉक्रोच जनता पार्टी नेमकी काय आहे?

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुणाई ही झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. सरन्यायाधीश यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी नावाचं आंदोलन सोशल मीडियावर सुरू करण्यात आलं. महाराष्ट्रातील तरुण असलेल्या अभिजीत दिपके यांनी हे आंदोलन सुरू केलं. त्यानंतर या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काही दिवसांमध्येच या कॉक्रोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या कोट्यवधीच्या घरात पोहोचली. दरम्यान त्यानंतर अभिजीत दिपके यांना धमक्या येण्यास देखील सुरुवात झाली, या सर्व पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांच्या घराला पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in