• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग..

July 20, 2026 by admin Leave a Comment


नीट परीक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. थेट संसद भवनाकडे मोर्चा निघाला. आता हा मोर्चा संसद भवनाच्या परिसरात पोहोचला आहे. संसदेचे गेट बंद करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक रूग्णालयात आहेत. त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पत्र दिले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संसद भवनाच्या परिसरात गोंधळ उडाला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरिता आंदोलक आक्रमक झाली आहेत. यादरम्यानच दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. संसद भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. अभिजीत दिपके संसद भवनाकडे जाण्यासाठी आग्रही आहेत. अश्रूधुराच्या नळकांड्या फेकल्या आहेत. आंदोलकांना पांगवण्याचे काम सुरू आहे. संसदेचे मुख्य गेटही बंद करण्यात आले.

संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. कारण आंदोलकांची मुख्य मागणी आहे की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. सोनम वांगचुक यांनी आंदोलन मागे घेण्याबाबत भाष्य केले. पण त्यांनी सरकार पुढे 3 महत्वाच्या अटी ठेवल्या आहेत.

कॉक्रोच जनचा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके संसद भवनाजवळ पोहोचले आहेत. अनेक लोक या आंदोलनात सहभागी झाले. संसदेवरील मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मोर्चा पुढे निघाला. मोठा पोलिस बंदोबस्त संसद परिसरात बघायला मिळत आहे. अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी संसदेकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले आहे.

हे आंदोलन आता चिघळताना दिसत आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. कडक बंदोबस्त वाढवण्यात आला. संसदेचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलकांची मोठी संख्या बघायला मिळत आहे. अभिजीत दिपके यांनी उपोषण सोडले आहे. आता केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांना भेटण्यासाठी आता धर्मेंद्र प्रधान पोहोचले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in