• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी ! काँग्रेस सोडलेला बडा नेता एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकारणात पुन्हा खळबळ

July 31, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पक्षांतर पहायला मिळाले होते. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एका बड्या नेत्यांने एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. हा नेता कोण आहे? त्याने शिंदेंची भेट का घेतली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बडा नेता एकनाथ शिंदेंच्या भेटीला

अकोल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय खळबळ उडण्याची शक्यता. काँग्रेसचे माजी लोकसभा उमेदवार डॉ.अभय काशिनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटीत तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय ॲड. निलेश देशमुख हे देखील उपस्थित होते. ही भेट नेमकी राजकीय होती की खासगी, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र डॉक्टर अभय पाटील यांच्या या भेटीना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसकडून लढवली होती लोकसभा निवडणूक

डॉ. अभय पाटील यांनी 2024 ची अकोला लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यांनी 4 लाख 16 हजार 404 मतं घेत भाजपचे अनुप धोत्रे यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र अनुप धोत्रे यांनी 4 लाख 57 हजार 30 मतं मिळवत 20 हजार 626 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

वर्षभरापूर्वी काँग्रेसला रामराम

व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. अभय पाटील हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहिले असून मराठा क्रांती मोर्चाचे प्रादेशिक समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केल आहे. मात्र, जुलै 2025 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज झालेल्या या भेटीमुळे डॉ. अभय पाटील यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे अकोल्यासह संपूर्ण विदर्भाचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल
  • धक्कादायक, अमरावतीत हॉस्पिटलला आग, तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू
  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in