• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवाराने 20 कोटी घेतले? बड्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

June 10, 2026 by admin Leave a Comment


राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्याच पक्षाच्या एका नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज होत आहेत असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काँग्रेस उमेदवार रुग्णालयात

अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख निवडणुकीतून अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र आता ते नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना देशमुख यांनी म्हटले की, ‘मी निवडणुकीतून माघार घेतली नाही. माझा संपर्क सुरु आहे. माझ्यावर कुणालाही दबाव नाही, माझी प्रकृती बरी नाही म्हणून मी रुग्णालयात दाखल आहे.’ दरम्यान, आज हर्षजीत देशमुख यांच्यावर ॲजीओप्लास्टी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी कोट्यावधी रुपये घेऊन मॅनेज होत असल्याची चर्चा सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. ‘अमरावतीचा उमेदवार हा मॅनेज झाल्यासारखा आहे, पंधरा ते वीस कोटी रुपये त्यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. आम्हाला आज कळलं की ते एका खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये आहे व त्या ठिकाणाहून ते इंटरव्यू देत आहेत. ही चिड येणार सारखी गोष्ट आहे’ असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ठाकूर यांनी की, ‘या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असं मला कळलं आहे. कोट्यवधी रूपायांचा व्यवहार होत असेल व एवढी कॅश इकडच्या तिकडे होत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत?’ असा सवालही यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. ‘हेमंत पाटील जे म्हणत आहे त्यांची गोष्ट खरी आहे, ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नाही, संपूर्ण घोडेबाजार होत असून ही निवडणूक करप्ट होत आहे, याचा आम्ही निषेध करतो’ असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : फक्त या सवयी बदला; नशीबही बदलेल, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही
  • जिन्याखाली देवघर बांधणे का मानले जाते अशुभ? वास्तुशास्त्रातील महत्त्वाची सूचना
  • FIFA World Cup: मुस्लिम खेळाडूंना का दिली जात आहे वेगळी ट्रॉफी? पुरस्कारासाठी केला असा बदल
  • Vastu Shastra : झोपेतून उठताच कधीही पाहून नका या पाच वस्तू; संपूर्ण दिवस जाईल खराब, घरात येते नकारात्मक ऊर्जा
  • एअर होस्टेस या एका गोष्टीशिवाय राहुच शकत नाहीत, कॉकपीटमध्येच.., माजी एअर होस्टेसने सांगितलं विमानातील डार्क सीक्रेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in