• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! कर्जमाफीनंतर आता केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; मोदी सरकारची सर्वात मोठा घोषणा, चिंताच मिटली..

July 31, 2026 by admin Leave a Comment


नुकताच राज्यातील महायुती सरकारकडून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकर्‍यांना झाला असून, शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली आहे. यामुळे शेतकर्‍यांना थोडा का होत नाही परंतु दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता राज्य सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने देखील शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारकडून सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे, ज्याचा फायदा हा देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांना होणार आहे.

मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी(PM KISAN) योजनेला पुढील पाच वर्षांसाठी 230-31 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी 3.15 लाख कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या निर्णयासोबतच कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्री ‘सूर्य सरोवर योजनेना'(PM-SSY)देखील मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचे लाभार्थी असलेले शेतकरी सध्या या योजनेच्या 24 हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. याचवेळी केंद्र सरकारकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा 24 वा हप्ता शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळू शकतो असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.

आतापर्यंत या योजनेंतर्गत 23 हप्त्यांच्या माध्यमातून 4.47 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार 9.49 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 23 व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिला शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. चार शेतकऱ्यांमागे एक महिला शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान आता या योजनेला पुढील पाच वर्षांपर्यंत मुदत वाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं टेन्शन दूर झालं आहे. पुढील पाच वर्ष या योजनेंतर्गंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. या योजनेला 2030 -2031 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी आता 3.15 लाख कोटींच्या निधीची तरतूद  देखील करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in