• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर कोर्टात, शिवसैनिक कोर्टाबाहेर आक्रमक, थेट म्हटले, शिवसैनिकांच्या मनगटात..

June 20, 2026 by admin Leave a Comment


पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा आज निकाल आहे. खासदार ओमराजे निंबाळकर मुंबईत कोर्टात उपस्थितीत आहे. त्यांच्याकरिता हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तब्बल 20 वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर न्याय मिळण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच ठाकरे गटाची साथ सोडली. ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांपैकी एक ओमराजे निंबाळकर आहे. इतर 5 खासदार अज्ञातस्थळी आहेत. वडिलांच्या केसचा निकाल असल्याने ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबासोबत कोर्टात आहेत. कोर्टात या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. आरोपींसह वकील कोर्टात आहेत. न्यायालयाकडून या सर्व हत्याकांडाचे वाचन सुरू आहे. कोणत्याही क्षणी निकाल लागू शकतो. मात्र, यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमले आहेत.

ठाकरेंच्या शिवेसनेचे कार्यकर्ते मुंबई हायकोर्टाबाहेर जमले आहेत. ऑपरेशन तुडवा घोषणा झाल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून ऑपरेशन तुडवा सुरू करण्यात आले. याबाबत इशाराही दिला होता. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इशारा दिला. आता ओमराजे निंबाळकर कोर्टात असताना शिवसैनिक कोर्टाबाहेर दाखल झाले आहेत.

यादरम्यान कोर्टाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी म्हटले की, ओमराजे निवडून आल्यावर कसे दिसत होते आणि गद्दारी केल्यावर कसे दिसतात हे पाहण्यासाठी आलो. रात्र झाल्यावर दिवस येतो. आमचाही दिवस येईल.शिवसैनिक तोच आहे. आधीचा शिवसैनिक होता तोच आहे. तीच रग शिवसैनिकांच्या मनगटात आहे.  थोडावेळ वाट पाहा. तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार…कोर्टाबाहेर काहीतरी मोठे घडण्याची शक्यता आहे. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे.

त्यातच आक्रमक भूमिका शिवसैनिक घेताना दिसत आहेत. 6 खासदारांनी बंडखोरी केली, त्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचे सांगितले जात होते. पोलिसांकडून एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू आहे तर कोर्टातच्या बाहेर वातावरण तापताना दिसत आहे. 5 खासदार अज्ञातस्थळी असताना ओमराजे निंबाळकर कोर्टाच्या सुनावणीकरिता मुंबईत आलेत. कालच ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलत थेट आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in