• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ

July 8, 2026 by admin Leave a Comment


पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात कचरा डेपोच्या जवळ एक इमारत कोसळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे १४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू असून, परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. इमारतीच्या मागील बाजूस कचरा डेपो असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा ढिगाऱ्यावर पसरला असून, जेसीबीच्या साहाय्याने कचरा हटवण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून अडकलेल्यांपर्यंत बचाव पथकांना लवकर पोहोचता येईल.

घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून, पोलिसांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसराला घेराव घालण्यात आला आहे. अद्याप कोणतीही अधिकृत जीवितहानीची माहिती समोर आलेली नसून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण आणि नुकसान स्पष्ट होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कीबोर्डवर फक्त टायपिंग करता? ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे तुमचे काम होईल झटपट
  • Chanakya Niti : या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ
  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in