• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार? ऑपरेशन टायगरबाबत आतल्या गोटातून मोठी अपडेट, अनेक आमदार…

July 4, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, सहा खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदारच राहिले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या वाढून 13 वर पोहोचली आहे. दरम्यान महायुतीमध्ये खासदारांच्या संख्येच्या बाबतीत शिवसेना शिंदे गट हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोठं विधान केलं आहे. आबिटकर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले आबिटकर? 

ऑपरेशन टायगर दोन नंतर आता राजकीय वतृळात ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना आबिटकर यांनी मोठं विधान केलं आहे.  ऑपरेशन टायगर-3 कधी होईल तेही कळणार नाही,  एकनाथ शिंदे यांच्या झंझावाता अनेक आमदार, माजी मंत्री शिवसेनेत येणार आहेत.  केंद्रातील शिवसेनेचा चेहरा शिंदे साहेब राजकीय उपलब्धतेनुसार ठरवतील,  शिवसेना ठाकरे गट काय करते यापेक्षा आमदा भर हा संघटना मजबूत करण्यावर आहे, असंही यावेळी आबिटकर यांनी म्हटलं आहे, ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

दरम्यान त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत देखील माहिती दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिंदे साहेबांना धावपळीमुळे त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र शिंदे साहेब हे ऐकणारे नाहीत. परंतु त्यांना सध्या आरामाची गरज आहे. अशी माहिती यावेळी  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी  दिली आहे. प्रकाश आबिटकर यांच्यापूर्वी मंत्री संजय शिरसाट यांनी देखील ऑपरेशन टायगर सुरू झालं असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in