• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! उदय सामंत यांच्या पत्नीची माघार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

May 25, 2026 by admin Leave a Comment


अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक दहा वर्षांनंतर पार पडत आहे. मात्र या निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या उमेदवारीमुळे महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता नीलम शिर्के यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक जारी केले आहे. यात त्यांनी निवडणुकीतून माघार का घेत आहोत याची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नीलम शिर्के यांचे पत्रक

सस्नेह नमस्कार..,

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही संस्था मराठी चित्रपट आणि त्यासाठी पडद्यावर आणि पडद्यामागे कार्यरत असणाऱ्या सर्व घटकांच्या हितवृद्धीसाठी मागील साठ वर्षापासून कार्यरत आहे.

मी स्वतः मराठी नाटके, चित्रपट, मालिका या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून रंगभूमीची सेवा करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंग भूमी प्ररिषद या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील सर्व घटकांच्या हितवृद्धीच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील कलाकार कामगारांसहित इतर सर्व घटकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेसाठी आपण योगदान द्यावे असा विचार मनात होता.

नुकतीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणुक जाहीर झाली आणि या निवडणूकीच्या प्रक्रियेत प्रमुख भूमिकेत सहभागी असणारे चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. मेघराज राजे भोसले आणि अभिनेते श्री. आनंद काळे या दोघांनीही मी या निवडणुकीत उभे राहण्याबद्दल आग्रही विनंती केली. त्यांचा मान राखून सदर निवडणुकीत सहभागी होण्याचे मी ठरवले होते आणि त्या अनुषंगाने लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून मी स्वतः अभिनेत्री या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.

दरम्यान चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाच्या सदस्य असलेल्या वर्षाताई उसगावकर यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नसल्याचे मला स्वतः मेघराज राजे भोसले यांनीच कळविले होते, तथापि अभिनेत्री प्रवर्गातून वर्षाताईनी अखै दाखल केल्याचे मला माझा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता कळाले, मुळात वर्षाताई यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधात निवडणूक लढवून चित्रपट महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नाही.

निवडणूक कार्यक्रमातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापासून सुरू होत आहे असे असतानाही प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांमधून काही मंडळींनी आरोप प्रत्यारोप आणि इतरांवर चिखल फेक करायला सुरुवात केली आहे, ही बाब मनाला खेद देणारी आणि अत्यंत वेदनादायक आहे.

मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी किंवा सक्रिय सदस्य नाही तर मी केवळ आणि केवळ रंगभूमीवर श्रद्धा ठेवणारी आणि मागील २५ वर्षापासून रंगभूमीची सेवा करणारी एक महिला कलाकार आहे, याचे देखील भान या विषयाचे राजकारण करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते असे मी अतिशय नम्रपणे नमूद करू इच्छिते.

आज सकाळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांच्यासहित काही जेष्ठ रंगकर्मीशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. वर्षाताईसहित चित्रपट आणि नाट्यसृष्टीत कार्यरत असणाऱ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान राखून मी या निवडणुकीत वर्षाताई उसगावकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कार्यालयीन बाब उद्या पूर्ण करण्यात येईल.

राहिला प्रश्न रंगभूमी प्रतीच्या माझ्या योगदानाचा आणि कार्याचा…

मी सध्या नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर रंगभूमीची आणि दिव्यांग कलाकारांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहेच, यापुढे माझ्या परीने चित्रपट महामंडळासाठी देखील योगदान देत राहील…

तूर्तास एवढेच…

माझी उमेदवारी माघारी घेण्यामुळे कुणाची गैरसोय झाली असल्यास मी व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त करते, आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंबासाठी मनःपूर्वक धन्यवाद..!



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शर्वरी वाघच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा,ग्लॅंमरस फोटो पाहून म्हणाल…
  • India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्री
  • ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ‘बॉडी टॅपिंग’ कसे काम करते?
  • कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकत का? मराठमोळ्या वेब सीरिजने वेधलं लक्ष
  • ICC Guidelines: प्रेग्नसीनंतर महिला क्रिकेटपटू संघात पुनरागमन कसं करणार? आयसीसीने दिल्या अशा सूचना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in