
अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध झालं, तब्बल 40 दिवस हे युद्ध सुरू होतं, त्यानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. मात्र अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूजमध्ये तणाव कायम आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची इराणसोबत चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला मोठी धमकी दिली आहे. आम्ही एका तासाच्या आत इराणमधील सर्व पूल आणि पावर प्लांट उद्ध्वस्त करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स बिजनेस नेटवर्कच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या या धमकीमुळे पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या या धमकीमुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले ट्रम्प?
अमेरिका एका तासामध्ये इराणमधील सर्व पूल आणि पावर प्लॅट उद्ध्वस्त करेल अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. पुढे बोलताना इराणला पश्चिम आशियावर ताबा मिळवण्यापासून देखील आम्ही रोखले आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. इराणला पश्चिम आशियावर ताबा मिळवायचा होता, तशी त्यांची इच्छा होती, परंतु आम्ही त्यांना पश्चिम आशियावर ताबा मिळवण्यापासून रोखले आहे. हे सर्व श्रेय माझ्या त्या निर्णयाला जाते जेव्हा आम्ही इराणच्या अणू केंद्रांवर एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे इराण ब्लॅकफूटवर गेल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ट्रम्प यांनी असं देखील म्हटलं आहे की, जर आम्ही इराणवर हल्ला केला नसता तर काही आठवड्यांमध्येच इराणने पश्चिम आशियामधील देशांवर हल्ला केला असतो. आम्ही जर इराणवर हल्ला केला नसता तर कदाचित एक महिन्याच्या आत इराणकडे आण्वस्त्र असंत आणि त्यांनी त्याचा वापर इस्त्रायल विरोधात तसेच मध्यपूर्वेमध्ये केला असता असा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीमुळे आता पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे, यावर अजून इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.
Leave a Reply