• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! इटलीमध्ये भारतीयांवर मोठा हल्ला, दोन जण ठार, जगात हाहाकार, थेट..

April 19, 2026 by admin Leave a Comment


नुकताच अत्यंत धक्कादायक बातमी पुढे येत आहे. इटलीच्या बर्गामोमध्ये गुरुद्वारा परिसरात खळबळ उडवणारी घटना घडली. थेट भारतीय लोकांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर खळबळ उडाली. मिळालेली अधिक माहिती अशी की, दोन व्यक्तींकडून गुरुद्वारा परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन भारतीय व्यक्ती ठार झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. ला सिसिलियाच्या रिपोर्टनुसार, हल्ला मध्यरात्री झाला. गुरुद्वारा माता साहिब काैर जी स्थित चाैकात हल्ला झाला. गुरुद्वाऱ्यातून बाहेर पडत असताना हा हल्ला झाला. हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. राजिंदर सिंह आणि गुरमित सिंह अशी दोघांची नावे आहेत. दोघेही भारतीय आहेत. उपस्थितांनी या हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती सांगत म्हटले की, हल्लेखोरांपैकी एक आरोपी भारतीयच होता. गोळीबारानंतर हल्लेखोर तात्काळ घटनास्थळाहून पळ काढला. त्यांच्याकडे गाडी होती.

हल्ला होण्यापूर्वी काही वाद झाल्याचीही माहिती मिळत आहे. त्यानंतर गोळीबाराची घटना घडली. ज्या व्यक्तीने गोळीबार केला, तो देखील गुरुद्वारात येत असल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात अजून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे, त्याला गोळी लागली. त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळाहून पोलिसांना 10 राऊंट  मिळाले आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, या हल्ल्याचा कट अगोदरच रचण्यात आला होता. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी इटली पोलिसांनी मोठे सर्च अभियान राबवले आहे. हल्लेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची चाैकशी पोलिसांकडून केली जात आहे.

इतक्या वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा पूर्णनियोजित कट असल्याचे सांगितले जात आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांचे जवाब नोंदवली जात आहेत. मागील काही दिवसांपासून विदेशात भारतीय लोकांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामध्येच आता ही नवीन घटना पुढे आली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतात दर 3 पैकी एका व्यक्तीला असतो हो सायलेंट आजार; वेळीच सावध व्हा नाहीतर…
  • होर्मुझ पुन्हा बंद, इराणचा सर्वात भयंकर डाव, अमेरिकेचं जहाज दिसताच…जगाला हादरवणारं सत्य अखेर बाहेर!
  • 25 वेळा पाहिलं पण मन भरलं नाही, तेरे इश्क में नाचेंगे गाण्यावर महिला डान्स, सिंपल स्टेपने लावलं वेड
  • मोठी बातमी! भारताचा ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका; एका निर्यामुळे अमेरिकेत खळबळ, चीनसोबत मिळून केला मोठा गेम
  • क्रिकेटच्या मानगुटीवर अंडरवर्ल्डंचे भूत? बिश्नोई गँगच्या धमकीने बदलला थेट संघाचा कर्णधार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in