• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

क्रिकेटच्या मानगुटीवर अंडरवर्ल्डंचे भूत? बिश्नोई गँगच्या धमकीने बदलला थेट संघाचा कर्णधार!

April 19, 2026 by admin Leave a Comment

Canadian Cricket Match Fixing Case: बॉलिवूडसह क्रिकेटवर कधीकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डची दहशत होती. सामना पाहायला डॉन, भाई, पंटर लोक यायची. तर पाकच्या खेळाडूंचे दहशतवादी आकांशी घरगुती संबंध असल्याचा आरोपही झालेला आहे. 26 वर्षांपूर्वीचे अंडरवर्ल्डचे हे भूत पुन्हा क्रिकेटच्या मानगुटीवर बसू पाहत आहे. वर्ष 2000 मध्ये मॅच फिक्सिंगवरून क्रिकेट विश्व ढवळून निघाले. दाऊद इब्राहिमच्या D कंपनीने हे घाणरेडे राजकारण क्रिकेटमध्ये आणले होते. पण नंतर हे वादळ शमलं. आता ते हा जीन पुन्हा बाटलीबाहेर आला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्री-अभिनेते, दिग्दर्शकांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बिश्नाई गँगचे नेटवर्क जगभरात आहे. आता कॅनडातील मॅच फिक्सिंगचे धागेदोरे या कुख्यात गँगशी जोडले जात आहेत.

लॉरेन्सची दहशत, कर्णधारच बदलला

कॅनेडाचे राष्ट्रीय ब्रॉडकास्ट चॅनल CBC वर एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात येत आहे. त्यात मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात येत आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यानुसार कॅनडाचा संघ T-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी गेला होता. त्यात लॉरेन्स बिश्नोई याच्या सांगण्यावरून खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता.

चॅनलच्या दाव्यानुसार, कॅनडा संघाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा हा होता. त्याला ही टुर्नामेंट सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरच संघात स्थान देण्यात आले आणि लागलीच कॅप्टन करण्यात आले. अशा काही घटना घडल्या की बाजवा संघातही आला आणि त्याला लागलीच संघाचे कर्णधार पद ही देण्यात आले.

CBC च्या चौकशीत धक्कादायक खुलासा

कॅनडात सध्या या मॅच फिक्सिंगवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम हा खेळाडूंना धमकावून आमिष दाखवून मॅच फिक्सिंग करत होता. लाँरेन्स बिश्नोई गँगने हाच रस्ता धरल्याचे म्हटले जात आहे. कॅनडात याविषयीचा तपास करण्यात आला आहे. त्यात T-20 वर्ल्ड कपमध्ये कॅनडा विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पूर्णपणे फिक्स असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयसीसीने एक प्रतिनिधी पाठवून त्यासंबंधीची चौकशीही सुरू केली आहे. तर आता या प्रकरणात थेट बिश्नोई गँगचे कनेक्शन समोर येत असल्याने त्याचे गांभीर्य आणि गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LIC चे हे दोन प्लान जे तुम्हाला देतील जीवनभर कमाई, उमंग आणि उत्सव कोणता बेस्ट ?
  • तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती उपाय
  • 72 वर्षीय अभिनेत्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक, निघून गेले गुपचूप..; नेटकऱ्यांचा राग अनावर
  • इराण अमेरिकेला देणार 450 किलोग्रॅम युरेनियम, त्यापासून नेमके किती अणुबॉम्ब तयार होऊ शकतात?
  • पहिली डेट फ्लॉप होण्याची भीती वाटतेय? मग चुकूनही करु नका या गोष्टी, नाते सुरु होण्यापूर्वीच संपेल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in