• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भारताचा ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका; एका निर्यामुळे अमेरिकेत खळबळ, चीनसोबत मिळून केला मोठा गेम

April 19, 2026 by admin Leave a Comment


मध्य पूर्वेत मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धविरामानंतर इराणने पहिल्यांदाच स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर अमेरिकेनं घेतलेल्या भूमिकेमुळे इराणने पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला. याचदरम्यान इराणकडून भारताच्या दोन तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना देखील शनिवारी घडली होती. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इराणने या मार्गावरील 20 जहाजं परत पाठवली, ज्यामध्ये भारताच्या दोन जहाजांचा देखील समावेश होता अशी माहिती समोर येत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे आता मध्य पूर्वेत पुन्हा एकदा मोठा तणाव निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा जगावर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या युद्धात गुंतलेले असताना दुसरीकडे भारत आणि चीनने मिळून अमेरिकेला सर्वात मोठा धक्का दिला आहे.

तेलाचं राजकारण आणि डॉलरच्या मजबुतीकरणासाठी डोनाल्ड ट्रम्प सध्या अनेक देशांसोबत शत्रूत्व घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर देखील हल्ला केला होता, त्यानंतर इराणसोबत देखील युद्ध सुरूच आहे. यातच आता भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. भारताच्या नव्या निर्णयामुळे डॉलरच्या मुल्यामध्ये घसरणीची शक्यता आहे. भारतीय कंपन्यांनी परदेशातील सामान खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या पेमेंटच्या धोरणामध्ये बदल केला आहे. भारतीय कंपन्यांनी आता पेमेंट अमेरिकन डॉलरऐवजी चीनचं चलन असलेल्या युआनमध्ये देण्यास सुरू केली आहे. याचा मोठा फटका हा अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्यांनी नुकतचं इराणकडून तेल खरेदी केलं, तेव्हा देखील भारतानं इराणला पेमेंट हे डॉलरमध्ये न करता चीनी युआनमध्येच केलं होतं. तसेच आता चीनीमधून भारत ज्या गोष्टी आयात करणार आहे, त्याचं देखील पेमेंट हे चीनी युआनमध्येच केलं जाणार आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये प्रचंड प्रमाण घसरण सुरू आहे. या घसरणीला ब्रेक लावण्यासाठी तसेच डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतीय कंपन्यांकडून आता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यामुळे आता अमेरिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारत आता चीनमधून खरेदी होणाऱ्या मालासाठी युआनमध्येच पेमेंट करणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • LIC चे हे दोन प्लान जे तुम्हाला देतील जीवनभर कमाई, उमंग आणि उत्सव कोणता बेस्ट ?
  • तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती उपाय
  • 72 वर्षीय अभिनेत्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक, निघून गेले गुपचूप..; नेटकऱ्यांचा राग अनावर
  • इराण अमेरिकेला देणार 450 किलोग्रॅम युरेनियम, त्यापासून नेमके किती अणुबॉम्ब तयार होऊ शकतात?
  • पहिली डेट फ्लॉप होण्याची भीती वाटतेय? मग चुकूनही करु नका या गोष्टी, नाते सुरु होण्यापूर्वीच संपेल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in