• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अमेरिकेची लाईफलाईन उद्ध्वस्त, एका पाठोपाठ तब्बल 7 भीषण हल्ले, जगभरात हाहाकार, ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का

August 1, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर भीषण युद्ध सुरू झालं, या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं. दरम्यान 40 दिवसांनंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती, परंतु त्यानंतर काही दिवसांमध्येच पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली. युद्धविराम संपल्याची घोषणा करताच अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ला केला तर दुसरीकडे अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ज्या ज्या मध्य पूर्वेतील देशांमध्ये अमेरिकेचं सैन्य तळ आहे, त्या देशांवर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे.

भीषण हल्ल्यांनी अमेरिका हादरली आहे, एक नाही दोन नाही तर तब्बल सात ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हे हल्ले इकडे तिकडे न करता थेट अमेरिकेच्या लाईफलाईनवर करण्यात आले आहेत. अमेरिकेची लाईफलाईन उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या सर्व हल्ल्यांमागे अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या इराणचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अजूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट या सायबर हल्ल्यांमागे इराण असल्याचं म्हटलं नाहीये. जर डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांमागे इराण असल्याचं म्हटलं तर त्यामुळे जगभरात अमेरिकेची नाचक्की होण्याची शक्यता आहे, इराणकडून थेट अमेरिकेवर हल्ला करण्यात आला तर ही एक जगाच्या दृष्टीने मोठी घटना असणार आहे.

अमेरिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या साखळीवरच थेट सात सायबर हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे अमेरिकेची पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, अमेरिकेच्या अनेक राज्यांमधील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांना म्यान्यूवल पद्धतीने पाणीपुरवठा करण्याची पाळी तेथील सरकारवर आली आहे. अमेरिकन प्रशासनासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणात अजून तरी थेट इराणचं नाव घेतलेलं नाही, मात्र या हल्ल्यांमागे इरणचाच हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे, हा हल्ला कसा आणि नेमका कुठून झाला, याचा तपास आता अमेरिकेकडून सुरू आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in