• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, तुला हॉटेलमध्येच… नेमकी भानगड काय?

May 22, 2026 by admin Leave a Comment


भाजप आमदार प्रसाद लाड यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये धमकीचे फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड हे काल रात्रीपासून शहरात मुक्कामी होते. याच दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करू तसेच गाडी फोडण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. आंदोलन सुरू असताना तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत होतात, आता भेट का घेत आहात, असा सवाल करत ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, प्रसाद लाड आज सकाळी अंतरवाली सराटीकडे रवाना झाले असून ते लवकरच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. या भेटीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
  • Womens T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी शुभसंकेत!
  • मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in