• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?

August 12, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बनावट टेंडरचा प्रकार समोर आला आहे. कुंभमेळ्यासाठी विविध वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली ठेकेदारांना बनावट टेंडर आणि वर्कऑर्डर दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तब्बल 400 ते 500 कोटी रुपयांचा गंडा घातला गेल्याचे समोर येत आहे. या प्रकरणामुळे कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान बनावट कागदपत्रांचा वापर करून ठेकेदारांना लक्ष्य केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणामुळे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात महाजन यांच्या दोन नातलगांना अटक झाल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना दोषींवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

महाजन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणाची माहिती दिली. कुंभमेळ्याचे कोणतेही टेंडर ऑफलाइन दिले जात नसताना बनावट टेंडर ऑफलाइन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारात चार जणांचा सहभाग असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. पत्रकारांना बनावट वर्कऑर्डर दाखवत पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

महाजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “गुन्हा अक्षय, नातवाईक असला तरी गय करणार नाही.” त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास आणि कारवाईकडे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in