• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी कारवाई? सीजेपीचे आंदोलक अडचणीत? थेट पासपोर्टच रद्द? सीसीटीव्ही, व्हिडिओ फुटेज आणि…

July 23, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतरमंतरवर सोमवारी प्रचंड मोठं आंदोलन झालं. यावेळी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलकही आक्रमक झाले. या आंदोलनात दगडफेकही झाली. त्यामुळे आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलीस मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. या आंदोलनावेळी ज्यांनी हिंसा केली अशा लोकांचे पासपोर्ट रद्द करण्यात येऊ शकतो. त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, या आंदोलनात ज्यांनी हिंसा केली त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. व्हिडीओ फुटेज, सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आणि इतर डिजीटल पुराव्यांच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात येत आहे. हिंसेत भाग घेतल्याचं आढळून आलेल्या लोकांवर विविध कलमांतर्गत गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.

परदेशात जाताना अडचणी

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणं, कायदा सुव्यवस्था भंग करणं आणि हिंसक घटनांमध्ये भाग घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा आरोपींचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी संबंधित प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकांना भविष्यात परदेशात प्रवास करताना अडचणी येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गृह विभागाची अधिसूचना

सध्या पोलीस पूर्ण घटनाक्रमाची चौकशी करत आहे. हिंसेत सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. दुसरीकडे दिल्लीच्या उपराज्यपालांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) खाली अटक करण्याच्या पोलिसांच्या अधिकारात 18 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या बाबत दिल्ली सरकारच्या गृह विभागाने 15 जुलै रोजी अधिसूचना जारी केली आहे. कॉकरोच जनता पार्टीने नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रश्नावर दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू केलेलं असतानाच दिल्ली सरकार आणि उपराज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे.

काय घडलं?

दिल्लीत गेल्या 33 दिवसापासून सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. पण पोलिसांनी त्यांचं उपोषण मोडीत काढलं. त्यामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या तरुणांनी सोमवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे वातावरण अधिकच तापलं. देशभरात या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. विविध राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तसेच दिल्ली पोलिसांच्या कारवाईचाही सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in